कोरपणा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोरपणा:- तालुक्यातील गट ग्रामपंचायत भारोसा अंतर्गत येत असलेल्या मौजा इरई येथील मुख्य म्हणजे इरई ते कवठाळा रस्त्यात अनेक ठिकाणी मोठं मोठे खड्डे पडून गिट्टी बाहेर निघाली असून सदर रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावं अशी मागणी आम आदमी पार्टी चे जिल्हाउपाध्यक्ष सूरज भाऊ ठाकरे याच्या मार्गदर्शनाखाली आम आदमी पार्टीचे कोरपणा तालुका सहसंघटक निखिल पिदूरकर यांनी उपविभागीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग गडचांदूर याच्या कडे सदर प्रकरणाबाबत निवेदन देऊन केली. यावेळी दिवसेंदिवस वाढत असलेल्या अपघाताबाबत सविस्तर माहिती दिली.
या निवेदनात म्हटले आहे की, इरई ते कवठाळा या रस्त्यावर जागोजागी खड्डेच खड्डे पडल्याने वाहनधारकांना वाहन चालवीताणा जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते या रस्त्यावर दररोज वाहन चालकाचे अपघात होत आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही हा रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा ठरत असल्याने या रस्ताची तात्काळ दुरुस्ती करणे अत्यावश्यक असल्याने प्रशासनाला सांगून तात्काळ रस्त्याची दुरुस्ती/नूतनीकरणं करण्याची मागणी आम आदमी पार्टी पक्षा कडून करण्यात आली. विशेष म्हणजे गावातील रुग्ण गर्भावती स्रियाना दवाखान्यात घेऊन जाण्यास खूप मोठा त्रास गावकर्यांना होत असल्याची माहिती आप आदमी पार्टी चे जिल्हाअध्यक्ष जिल्हाउपाध्यक्ष याच्या मार्गदर्शना खाली निखिल पिदूरकर तालुका सहसंघटक यांनी या निवेदना द्वारे उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग गडचांदूर यांना दिले त्या वेळेस आम आदमी पार्टी चे इरई येथील अध्यक्ष धनराज भगत उपस्थित होते.

