संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी
मोबा. न 9923497800
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील राजुरा गोविंदपुर राष्ट्रीय महामार्ग करिता कोरपना तालुक्यातील संपूर्ण नाले पोखरल्या जात आहे असे असताना मात्र खनिकर्म विभाग व जिल्हाधिकारी यांच्या देण्यात आलेल्या मंजुरी पत्रामध्ये रेतीचा उपसा करता येणार नाही तसेच शेतीला किंवा नाल्या काठावर नियम प्रमाणे उत्खनन करण्याबद्दल शासनाचे धोरण आहे तसेच मुरूम दगड उत्खननासाठी दिलेल्या मंजुरी आदेशामध्ये अटी व शर्ती टाकून दिलेले आहे मात्र या सर्व आदेशाला केराची टोपली दाखवत नियमबाह्य मंजुरी पेक्षाही अधिक उत्खनन अविरत 24 तास जीआरआयएल या कंपनीकडून केल्या जात आहे मात्र याबाबत महसूल विभाग आणि कर्म विभाग या प्रकरणाकडे डोळेझाक करीत असून तक्रारीची साधी चौकशी न करणारे खनी कर्म विभागातील ते महाभाग बिनधास्त अधिकारी कोण याची सर्वत्र चर्चा आहे.
शेतीसाठी राज्य शासनाचे धोरण ठरले असून याकडे दुर्लक्ष करीत कडोली वनोजा अंतरगाव धामणगावया नाल्यावर पंचनामा किंवा मोजमाप केल्या गेले नाही जलसंधारण अधिकारी मोक्यावर जाऊन कुठलीच तपासणी केली नाही. मान्यतेपेक्षा अधिक उत्खनन सर्रास केल्या जात असून आसन नाला पुलाजवळ वडगाव शेत शिवारात मोठ्या प्रमाणात नाल्यातून पोखरलेल्या रेतीचा वापर केल्या जात आहे. तसेच देवघाट झाल्यावर कुसळ धानोली माथा फाटाचार किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण उध्वस्त झाले असून ठीक ठिकाणी खड्डे पडलेले आहे. प्रधानमंत्री सडक योजनेतून ह्या रस्त्याचा निर्माण दोन वर्षांपूर्वी करण्यात आला होता या रस्त्याची वाहन अतिभार मर्यादा 30 टनाची असताना 70 ते 80 कल दगड माती मुरूम रेतीची वाहतूक करून पूर्ती रस्त्याची वाट लागली आहे. यामुळे या कंपनीच्या मुजोरीने शेतकरी व नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून पायाभूत सुविधा कोणताही उपक्रम या कंपनीने राबवलेला नाही उलट पाषाण उघडे पडेपर्यंत रेती मुरूम दगड उत्खनन करून नाल्या काठावरील गावांना पाणी टंचाईचा फटका निर्माण झाला आहे.
महसूल विभाग मान्यतेपेक्षा अधिक उत्कलन झाल्याबद्दल कारवाई करणार का तहसीलदार कोरपणा यांनी उत्खननाचा अहवाल व मोजमाप करण्याबद्दलची मागणी केली आहे. मात्र तक्रारी व अहवाल बसताना बांधून आंधळ दळतंय कुत्र पीठ खाते बोलणार कोण अशी अवस्था राष्ट्रीय महामार्गाच्या कंत्रटदाराची मनमानी सुरू असून कोरपणा येथील नव्यानेच रुजू झालेले आयएएस अधिकारी यांनी अवैध उत्खननाचे दोन वाहन जप्त करून दंडात्मक कारवाई केली आहे. मात्र खनिकर्म विभाग खळबळून अजून हि जागा झालेला नाही यामुळे नेमकं पाणी कुठे मुरत आहे त्याबाबत सामान्य नागरिकांमध्ये चर्चेला उत आला आहे.

