नासिर सुलेमान खान, नवी मुंबई प्रतिनिधी
अलिबाग,9 सप्टेंबर:- येथील पेन पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गणेश उत्सवासाठी आपल्या मूळ गावी आलेल्या पती पत्नी मध्ये वाद झाला. या कौटुंबिक वादातून पतीने आपल्याच पत्नीच्या डोक्यात गॅसचा सिलेंडर घालून तिचा खून केला. ही घटना पेण तालुक्यातील चांदेपट्टीत उघडकीस आली आहे. त्यामुळे सर्विकडे एकच खळबळ उडाली आहे.
सुवर्णा संजय दळवी असे वय 40 वर्ष हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर संजय तुकाराम दळवी, असे आरोपी पतीचे नाव आहे. त्याला पेण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. ही घटना गुरुवारी घडली. पतीने रागाच्या भरात हे भयानक पाऊल उचललं आहे. दळवी पती पत्नी हे कामानिमित्त ठाण्यात राहायचे. गणेश उत्सवनिमित्ताने ते आपल्या मुलांसह पेण तालुक्यातील चांदेपट्टी या मूळ गावी आले होते.
मात्र, गुरुवारी रात्री त्यांच्यात काही कारणावरुन वाद झाला. यानंतर संतापलेल्या संजयने रागाच्या भरात सुवर्णाच्या डोक्यात सिलेंडर घातले. यात ती गंभीर जखमी झाली. यानंतर रक्तबंबाळ झालेल्या सुवर्णा व कुटुंबातील अन्य सदस्यांच्या आरडाओरडयाने परिसरातील नागरिक तेथे आले. यानंतर त्यांनी सुवर्णला पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आपल्याचा पत्नीची हत्या केल्या नंतर आरोपी पती संजय दळवी याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.