अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात आयोजित ७ व ८ आक्टोबर २०२३ रोजी पार पडलेल्या दोन दिवसीय महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ, सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण तसेच शिवापूर येथील उपजिल्हा रुग्णालय आणि बोरगाव मंजू येथील ग्रामीण रुग्णालयाचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते.
त्यावेळी अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाच्या नूतनीकरणासह सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येईल, गरजूंना आवश्यक उपचार मिळवून देण्यासाठी निधीची उणीव पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.
आपण अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने अकोला हे मेडिकल हब होताना सर्वसामान्यांना परवडणाऱ्या उपचार सुविधा उपलब्ध होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. त्यासाठी सर्व शासकीय वैद्यकीय संस्थांचे बळकटीकरण करण्यात येईल. असे सांगितले होते. परंतु दोन तिन महीने उलटूनही अद्याप पर्यंत शासकीय सर्वोउचार रुग्णालय व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आले नाही. शिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाल जिल्हा सर्वोपचार रुग्णालय संदर्भित झाले असून या ठिकाणी ४७६ खाटांची संख्या मंजूर आहे. मात्र प्रत्यक्षात १०५० च्या वर रुग्ण दररोज या ठिकाणी उपचार घेतात याचा अतिरिक्ततान कर्मचारी वर्गावर येतो, त्यामुळे अपुऱ्या सुविधा पडत आहेत. शिवाय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला देखील २२३ पदे मंजूर असताना ११७ पद अद्याप त्या ठिकाणी रिक्त आहेत. तसेच वर्ग ४ च्या सुद्धा चाळीस टक्के जागा रिक्त असल्याने ते तात्काळ भरण्यात याव्यात.
दरम्यान अपुरे मनुष्यबळ असतांना सुद्धा १ ऑगस्ट २०२२ पासून सुपर स्पेशालिटी येथे ओपीडी सुरू केली व आता एमआरआय ची देखील सुविधा त्याठिकाणी उपलब्ध करून दिली. दिवसेंदिवस रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासकीय सर्वोपचार रुग्णालय व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मधिल ह्या रीक्त जागा त्वरित भरून सर्वोपचार रुग्णालय व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात यावे तसेच अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय येथील रिक्त असलेल्या जागा त्वरित भरण्यात याव्यात. याकरिता हे निवेदन तथा स्मरणपत्र आपल्या सेवेत सादर करत आहे.

