आशीष अंबादे, वर्धा जिला प्रतिनिधि
मोबा. 8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील काही लोकांबरोबर दिल्लीतील तीन ठगाणी बियाणे खरेदीच्या नावावर फसवणूक करून लाखो रुपय लूटल्याचा प्रकार समोर आला आहे.
वर्धा शहरातील स्नेहलनगर येथे राहणारे आकाश प्रमोद शेंडे तसेच नरेश खाडे यांनी एकूण 26 लाख 61 हजार रुपये किंमतीची बियाणे खरेदीचा सौदा केला. दिल्ली येथील जसवंत सिंग, कमलेंद्रा सिंग व साधना देवी यांनी विविध आमिष दाखवीत फोन केले होते. त्यास बळी पडून हा सौदा शेंडे व खाडे यांनी केला होता. दोघांनी पैसे पाठविले. मात्र अनेक दिवस लोटूनही बियाणे मिळालेच नाही. शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर शहर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार तीनही आरोपीं विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. दिल्लीच्या ठगांनी केलेली ही फसवणूक चांगलीच चर्चेत आहे.

