मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे ल्लोयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड आणि ल्लोयड्स इन्फिनिट फॉउंडेशन तर्फे दिनांक 29 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर पुरुष व महिलांसाठी जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यात गडचिरोली जिल्ह्यातील 36 पुरुष संघ आणि 15 पेक्षा जास्त महिला संघ सहभागी झाले होते. स्पर्धा. पुरुष गटात गडचिरोली संघाने पहिला नंबर फटकावला तर महिला गटात विकासपल्ली संघाने पहिले विजेतेपद पटकावले. पुरुष गटात चौडमपल्ली संघ आणि महिला गटात गडचिरोली संघ उपविजेता ठरला. या कार्यक्रमात ल्लोयड्स चे कर्मचारी आणि स्थानिक लोक मोठया प्रमाणात सहभागी झाले होते, आणि या खेळातून सर्वत्र कौतुक केले जात आहे.

