मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन हिंगणघाट:- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने हिंगणघाट येथील संत गोमाजी वार्ड मध्ये राहणारे श्री. श्रेयस अरविंदजी दहापुते यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग ची परीक्षा उत्तीर्ण करून यश प्राप्त केले. त्यानिमित्त त्यांचे अभिनंदन करण्याकरिता पक्षाच्यावतीने तालुकाप्रमुख मा.श्री. सतीशभाऊ धोबे यांच्या नेतृत्वात त्यांच्या राहते घरी जाऊन त्यांना या यशा बद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले . त्यांनी त्यांच्या या यशाचे श्रेय त्यांच्या आई-वडिलांना दिले त्यांचे प्राथमिक शिक्षण हिंगणघाट येथे झाले तर, उच्च शिक्षण पुणे येथे अभियांत्रिकीत मेकॅनिकल मध्ये पूर्ण केले. पूर्व परीक्षेचा अभ्यास कुठलेही वर्ग न करता स्वतः सेल्फ स्टडी करून हे यश संपादन केले.
त्यांना अभिनंदन देण्याकरिता पक्षाच्यावतीने उपतालुकाप्रमुख प्रकाश अनासाणे, माजी नगरसेवक मनिष देवडे ,शंकर मोहमारे, ललितराव रडके, अविनाश धोटे, दिलीप वैद्य, आशिष भांडे,गजानन काटवले, शाम वाघमारे ,श्याम बोरधरे इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

