मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्वर्गवासी बिहारी जरीले शिक्षक, स्वर्गवासी उमेशभाऊ मानकर, विनोद वैद्य, प्रविण धुमाळ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सार्वजनिक व्यायाम प्रसारक मंडळ नंदोरी जाम यांच्या वतीने भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अनेक संघाने सहभाग घेतला.
सार्वजनिक व्यायाम प्रसारक मंडळ नंदोरी द्वारा आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी उपस्थित राहूत कार्यक्रमाला मार्गदर्शन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समुद्रपूर तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील,भाजपचे संजय डेहणे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गणेश वैरागडे, प्रशांत गौळकर,सुधीर गोठे, गजानन बोरेकर, डॉ. प्रविण खेळकर, अरुण सावरकर आदी मान्यवर उपस्थित होते…