नितीन शिंदे ठाणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- येथून नववर्षाच्या स्वागताच्या पूर्वसंध्येला अमली पदार्थांचे सेवन करीत रेव्ह पार्टी करणारे 90 तरुण आणि पाच तरुणी यांच्या दोन गटांवर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने रविवारी मध्यरात्री छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले. ही घटना समोर येताच संपूर्ण ठाणे शहरात एकच खळबळ माजली आहे.
31 डिसेंबरच्या नूतन वर्षात निमित्ताने या अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या रेव्ह पार्टी पार्टीचे आयोजन सुजल महाजन वय 18 वर्ष आणि तेजस कुबल वय 23 वर्ष यांना अमली पदार्थाची विक्री केल्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने बेड्या ठोकल्या आहे.
या रेव्ह पार्टीचे इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर सांकेतिक भाषेचा वापर करीत सुजल आणि तेजस यांनी प्रत्येकी एक हजार रुपये आकारून घोडबंदर रोडवरील वडवली गावाजवळ खाडीकिनारी पार्टी ठरविली हाेती. पार्टीसाठी ठाणे, नवी मुंबई, कल्याण – डोंबिवली, मीरा रोड भागातून शेकडो तरुण – तरूणी आले होते. त्याची माहिती मिळताच ठाणे पोलिसांनी मध्यरात्री ही पार्टी सुरू असतानाच छापा टाकला आणि आयोजक- सहभागी तरूणांची झिंग उतरवली. या छाप्यात 29 मोटारसायकली आणि आठ लाखांहून अधिक किंमतीचे अमली पदार्थ जप्त केले.
मद्यधुंद अवस्थेत थिरकताना सापडले तरुण.
या पार्टीतील डीजेचे साहित्य साहित्य पोलिसांनी जप्त केले. एका ठिकाणी 50 तर दुसऱ्या ठिकाणी 40 अशा दाेन गटांत हे नशेबाज पाेलिसांना मिळाले. यातील अनेक तरुण हे नशेमध्ये मद्यधुंद अवस्थेत डीजेच्या गाण्यावर थिरकत होते. पार्टीचे आयोजन करणाऱ्या दुकलीकडून आठ लाख तीन हजार ५६० रुपयांचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले.

