आशीष अंबादे, वर्धा जिला प्रतिनिधि
मोबा, 8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:– जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एक अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी परतत होती. बसला उशीर म्हणून तिने गावातून जाणाऱ्या एका दुचाकीस्वार इसमास लिफ्ट मागितली. आरोपी अक्षयने आपुलकी दाखवीत तिला दुचाकीवर स्वार केले. मात्र नंतर त्याची नियत बदलली मासोद गावालगत जंगल वाट आहे. या ठिकाणी गाडी थांबवून जबरीने मुलीला खेचत नेले. काय घडणार याचा अंदाज आलेल्या त्या मुलीने आरोपीच्या हाताचा कडकडून चावा घेतला. मात्र पळ काढताना ती पडली अन् आरोपीने डाव साधण्याचा प्रयत्न केला. तिला विवस्त्र केले. आता सुटका नाही याचे भान येताच तिने ओरड सुरू केली. किंकाळ्या ऐकून बाजूच्या शेतातील शेतकरी सतर्क झाले. हातात बॅटरी घेवून त्यांनी शोधाशोध सुरू केली. गावकरी येत असल्याचे पाहून मग आरोपीने काढता पाय घेत धूम ठोकली. हे गंभीर प्रकरण म्हणून मग पोलिसांकडे जाण्याचा निर्णय झाला. पीडित मुलीने खरांगणा पोलिसात तक्रार दिली. गुन्हा दाखल झाला असून पोलीस चौकशी करीत आहे.

