प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट दि. ०२जाने: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांच्यामार्फत शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीकांत मिरापूरकर यांच्या सूचनेनुसार तथा उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे तथा तालुकाप्रमुख सतीश धोबे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
केंद्र सरकारने हिट अँड रन चा कायदा पूर्ण देशभरात एक एप्रिल २०२४ पासून लागू करणार आहे. त्यांच्या या कायद्याच्या विरोधात देशभरातील सर्व वाहनचालक यांनी संप पुकारला आहे. यामध्ये आता अपघात झाल्यानंतर वाहनचालक पळून जाणे हे हिट अँड रन समजले जाते. तर आतापर्यंतच्या प्रकरणांमध्ये दोन वर्षाची तरतूद करण्यात येत होती. आणि जामिन मिळणेही शक्य होते. बदल्यात नवीन नियमानुसार जर कोणी वाहणाला धडक दिली आणि चालक पोलिसांना न सांगत असेल व घटनास्थळावरून पळून गेला की, त्याला ०७ वर्षा पर्यंतची शिक्षा आणि १० लाख रुपये पर्यंत दंड जाणार आहे. या कायद्याला चुकीचे ठरवत. देशभरात वाहन चालकांकडून संप सुरू आहे. कायद्यात या तरतुदीमुळे वाहन चालकांनी नसतानाही त्यांनी मोठी शिक्षा मिळणार आणि त्याची चिंता वाहन चालक मोठ्या प्रमाणावर व्यक्त करीत आहे.
धुक्यामुळे अनेक वाहनांचे अपघात होऊन विपरीत घटना घडत असताना असे झाले तर वाहन चालकाची चूक नसताना एखाद्या वाहन चालकांना मोठी शिक्षा भोगावी लागणार. त्यामुळे सदर कायदा रद्द करून जुन्याप्रमाणे कारवाई व्हावी असे आमच्या पक्षाच्या वतीने देशभरातील वाहन चालकांना आमच्याकडून समर्थन आहे. जोपर्यंत नवीन हिट अँड रन हा कायदा रद्द होत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून आंदोलनास सहभागी राहू. आपण जर सदर कायदा रद्द करण्यास केंद्र सरकारला भाग पाडावे, अशी आमची या निवेदनाद्वारे विनंती करतो.
वरील निवेदन देण्याकरिता तालुकाप्रमुख प्रकाश अनासाने, नगरसेवक मनीष देवडे, श्रीधर कोटकर, शंकर मोहमोरे ,गजानन काटवले, अनंता गलांडे, सुनील अष्टीकर, अनिल कडू, उमेश धोबे, शंकर भोमले, भास्कर ठवरी, नितीन वैद्य, चंदू भुते, प्रकाश घोडे, निखिल झिबळ, एस टि.कर्मचारी भास्कर मानकर, गौरव गाडेकर, गौरव डफ, अशीष भांडे, सुरेश चौधरी, प्रकाश भोसारी, राकेश धात्रक, गोवर्धन शाहू, महेश दूरतकर, माणिकराव धोटे, अनंता सोरटे, संतोष पगारे, सुरेश लोखंडे, जयंत लोहित, अनंता कांबळे, सुरेशजी लोणकर,गजानन बोरकुटे, दिनेश वैद्य, लक्ष्मीकांत भगत,लक्ष्मण घुगल, देवेंद्र तिकत, हनुमान गौळकर, कृष्णा लोहित, सतीश उईके इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.