देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- जिल्हातील टाकळघाट जवळील ग्रामपंचायत खापरी (मोरेश्वर) येथे नुकत्याच पार पडलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत शेंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपसरपंच झाल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
खापरी (मोरेश्वर) येथील जुन्या कार्यकारणीचा कार्यकाळ संपल्यामुळे नव्याने घेण्यात आलेल्या या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामीण क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा उभरते नेतृत्व प्रशांत शेंडे यांची बिनविरोध निवड केली. यावेळी नवनियुक्त ग्राम पंचायत सदस्यासह, मावळते ग्रामपंचायत सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामकृष्ण शेंडे, ईश्वर शेंडे, प्रमोद शेंडे, संतोष शेंडे, अमोल पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

