संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी
मोबा. न. 9923497800
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- आज दिनांक ३ जानेवारी ला मुंबई येथे देवगिरी बंगल्यावर झालेल्या कार्यक्रमात अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रशांत झांबरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
सदर कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, सामाजिक न्याय विभाग प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण उपस्थित होते.
प्रशांत झांबरे दोन दशकांपासून आंबेडकरी चळवळीत सक्रिय राहत अनेक सामाजिक आंदोलनात यांचा महत्वपूर्ण सहभाग असतात. याच कार्याची दखल घेत आज झांबरे यांची राष्ट्रिय अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते थेट जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. यावेळी चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इंजि. राकेश सोमानी, दर्शन मोरे, संघरतन फुलकर, समीर खान, मनोज बालमवार सोबत होते.
या नियुक्तीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, प्रदेश सचिव आबीद अली, शहर अध्यक्ष राजीव कक्कड, महिला जिल्हाध्यक्ष रंजना पारशिवे, कार्याध्यक्षा अर्चना बुटले, नगरसेवक महेंद्रसिंग चंदेल, विलास नेरकर, सुनील काळे, महादेव देवतळे, सुजित उपरे यांनी शुभेच्छा देत अजित दादा पवार, सुनील तटकरे व सुनील मगरे यांचे आभार मानले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

