विश्वनाथ जांभूळकर, एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली: येथील मदरलँड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा ०४ जानेवारी रोजी पार पडला. सोहळ्यात विविध स्पर्धेचे बक्षिस वितरण करण्यात आले.
स्नेहसंमेलन सोहळा प्रसंगी नगर पालिकेचे नगराध्यक्षा दिपयंती पेंदाम, न.पं.चे बांधकाम सभापती राघव सुल्वावार उपस्तीत होते. कार्यक्रमा दरम्यान स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक व उत्तीर्ण स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी नगरसेवक निजान पेंदाम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश खेडेकर, मुख्यध्यापक दादाजी जोडेवार,वासुदेव चाणकापुरे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

