राजकारणास्वार्थी घाईने केलेल्या अभिलेख नोंदणी चा पाठपुराव करताना झाली गडबड यामुळे 188 नागरिकांना जागावाटप पैकी 114 मिळाला न्याय आणि तब्बल 74 नागरिकावर झाला अन्याय याकरिता भीम आर्मी विदर्भ प्रमुख अंकुश कोचे कार्यालयास दिले नागरिकांनी निवेदन.
प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो . 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- कॉटनचे जुने शेत सर्वे क्रमांक 246 नवीन भूक क्रमांक 275/1 मोजा गुंखेडा जुना मोजा 108 नवीन मौजा 39 या मालमत्ते वरील शासन निर्णयानुसार पुलगाव कॉटन मिलने विक्री करून दिलेल्या रहिवासी कामगार प्लॉट धारकांना त्याचे मालकीचे सदर मालमत्तेचे नोंदणी भूमी अधिकार अभिलेख मध्ये नोंदणी घेऊन त्यांना 7/12 अजून पर्यंत 74 नागरिकांना मिळाला नाही.
स्वार्थी राजकारण करताना 74 नागरिकांवर झाला अन्याय पाठपुरावा करीत असताना पुलगाव कॉटन मिल्स पुलगावच्या मालकीचे नागपूर फाईल येथील जागा काही रहिवाशांना गिरणी सुरू असताना विकत देण्यात आलेली आहे. गिरणी खाजगी मालकाकडून दिनांक 30 मे 1976 रोजी ताब्यात घेऊन नंतर गिरणीचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. दिनांक 26 फेब्रुवारी 2003 रोजी मंत्रिमंडळाच्या समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार गिरणीच्या चाळीत रहात असलेल्या कर्मचाऱ्यांना 225 चौ.फूट जागा मोफत देऊन सदर जागा मालकी हक्काने हस्तांतरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला. 10 जानेवारी 2001 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार सदर गिरणी 31 ऑगस्ट 2003 ला बंद करण्यात आले.
पुलगाव कॉटन मिलने सदर मालमत्ता धारक रहिवासी कामगार यांच्याकडून योग्य ठराविक मोबदला घेऊन संबंधित कामगाराला वेळोवेळी विक्रीपत्र करून सुद्धा दिले जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या पुलगाव कॉटन मिलच्या मालमत्ता चे सर्वे क्रमांक 275/1 मोजा गुंखेडा क्रमांक 39 क्रमांक 108 वरील 183 मालमत्ता धारकाचे सातबारा अभिलेख नोंदणी करण्याची यादी जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे पुलगाव कॉटनच्या सदर सर्वे क्रमांक 275/1 आता धारक कामगार अर्जदारांना सुद्धा त्यांच्या मालमत्तेची नोंदणी अधिकार अभिलेखात होणे आवश्यक आहे तसेच कायदेशीर आहे त्यामुळे सदर 7/ 12 ची मागणीला अनुसरून अर्जदाराने अगोदर सुद्धा दिनांक 3/ 11/ 22 ला सुद्धा अर्ज केला आहे तसेच सदर अर्जाचा वेळोवेळी सदर कार्यालयात येऊन पाठपुरावा सुद्धा केला आहे परंतु त्यांना समानधारक कारवाई झाली नाही भू अधिकारी अभिलेखात नोंदणी घेऊन त्यांना त्यांचा नावाचा सातबारा निर्मित करण्यात यावा प्लॉट किंवा सदनिकेचे संपूर्णपणे मालक असून सुद्धा अधिकारी अभिलेखात नोंद नसल्याने त्यांना सदर मालमत्तेचा सातबारा ची शासकीय निमशासकीय कामात सतत आवश्यकता भासत आहे ज्या अर्थी 188 रहिवाशाचे नाव गिरणीचे सेवेत असताना विक्रीपत्र करून देण्यात आले आहे अशा 188 पैकी अनुसूचित मध्ये 114 रहिवाशांकडून काही रक्कम येणे बाकी नाही आणि त्यांचे नावे जागा करण्यास महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाची हरकत नाही अशा संलग्न अनुसूचीतील 114 रहिवाशांची नाव खरेदी पत्रिका प्रमाणे अधिकारी अभिलेखन नोंद घेण्याबाबत असे आदेश महाराष्ट्र शासनाकडून वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवण्यात आले.
परंतु त्यामध्ये सर्वश्री प्रशासनाची भूल करून 188 पैकी 114 नागरिकांनाच न्याय मिळाला आणि 74 नागरिक वर अन्याय करण्यात आला. 188 नागरिक हे कायद्याने पात्र आहे पण कदाचित ज्यांनी पाठपुरावा केला यांची काहीतरी मतभेद असावे याकरिता तब्बल 74 वर झाला अन्याय शासनाने याची पूर्ण वृत्ती करून 74 नागरिकांना कायद्याप्रमाणे सातबारा त्वरित देण्यात यावा ज्याअर्थी शेत मोजा सर्वे क्रमांक सर्वांचा 275 च आहे त्या म्हणजे विभाजन कसले त्यामध्ये कुठेतरी दिशाभूल झालेले स्पष्टपणे दिसून येत आहे याकरिता जिल्हाधिकार्यालय तसेच महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ प्रशासकीय कार्यालय नागपूर व महसूल खाते यांनी यावर दखल घेऊन लवकरात लवकर नागरिकांना त्यांची हक्काची जमीन चे सातबारे द्यावे याचे संबंधित पत्र भूमिलेख याचे दस्तावेज मुंबई महाराष्ट्र राज्य व्यवस्थापिका संचालिका महाराष्ट्र राज्य वस्त्र उद्योग महामंडळ मुंबई यांना माहिती करिता भीम आर्मी कार्यालयाकडून पाठवण्यात येणार सदर जिल्हाधिकारी कार्यालय याने यावर त्वरित दखल घ्यावा ही भीम आर्मी ची मागणी आहे.
यावेळी निवेदन देण्यासाठी उपस्थित गण बाबा रावजी चरडे बबन शेंडे विवेक कछवा प्रल्हाद चौधरी विजय चिकलकर गंगाराम किसावे मारुती निंबाळकर दीपक शिरसाठ नारायण कोकाटे मुकुंद सिंग ठाकूर ईश्वर गणवीर गणेश कोहळे किशोर सायनकर दिलीप गुल्हाने महादेव युनाते विजय टेंभुर्णे वंदना खोब्रागडे सुरेश बडे सुखदेव सिंग कछवा महावीर पतालिया सुरेश कछवा सुभाष फालके सरोज साहू रत्ननाल साहू सतीश पचवारे इत्यादी गण उपस्थित होते

