आम आदमी पार्टीचे कोरपणा तालुका सहसंघटक निखिल पिदूरकर यांचा आंदोलनाचा इशारा.
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोरपणा:- नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे म्हणून शासन आणि प्रशासनाने अनेक स्थिकाणी आरो मशीन स्वछ फिल्टर लावले आहे. पण स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन या याजनेला काळीमा फासत आहे.
कोरपणा तालुक्यातील गटग्रामपंचायत भारोसा अंतर्गत येत असेलेल्या मौजा इरई येथील आरो फिल्टर चे काम पाच महिन्या पूर्वी पूर्ण झाले असून सदर आरो गेल्या एका महिन्या पासून बंद पडला. पण याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी याबाबत आम आदमी पक्षाला तक्रार केली आहे.
जनतेला स्वछ फिल्टर पानी मिळावे करिता प्लांट लावले असून ते बंद असल्याने ग्रामस्था मध्ये संतापची भावना दिसत आहे. आम आदमी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्तानी आरो ची प्रत्यक्ष पाहणी करून त्या संदर्भात ग्रामपंचायतला भ्रमणध्वनी वरून माहिती दिली व तत्काल दुरुस्ती करून ग्रामस्थाना स्वछ पानी दयावे करिता माहिती देऊन तब्बल एक महिना झाला असून सुद्धा आरई येथील आरो चालू करण्यात आला नाही.
त्यामुळे हा स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा आरो प्लांट तत्काल सुरु न झाल्यास निषेध आंदोलन करण्यात येईल असे निखिल पिदुरकर यांनी कळवले आहे.