आशीष अंबादे, वर्धा जिला प्रतिनिधि
मोबा.8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील हिंगणघाट येथून खळबळजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे शहरात नशाखोरीचे वाढते प्रमाण यावर चर्चा सुरू झाली आहे.
हिंगणघाट शहरातील एका युवकाने गांजा या अंमली पदार्थची झाडे चक्क आपल्या घराच्या छतावर लावलीत. झाडे लावल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी याप्रकरणी आरोपी युवकाला बेड्या ठोकत गांजाची दोन ते अडीच फूट उंचीची 42 झाडं जप्त केली आहे.
हिंगणघाट शहरात चक्क आपल्या घराच्या वर गांजाची झाडे लावणाऱ्या आकीब वय 31 वर्ष रा. जगन्नाथ वॉर्ड हिंगणघाट याला पोलिसांनी कारवाई करत अटक केली आहे. आरोपी आकीब याने घराच्या छतावर गांजा अमली पदार्थाचे हिरवे, ओले अशी दोन ते अडीच फूट उंचीची ४२ झाडे लावली होती. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी आकीबच्या निवासस्थानी छापा मारला. यावेळी 369 ग्रॅम वजनाची 42 झाडे असा 4500 रुपयांचा माल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक करुन गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक मारुती मुळक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.