देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- दिनांक 4 जानेवारी गुरुवारला शाळेच्या प्रांगणात विविध खेळाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संजय गांधी निराधार योजनेची माजी अध्यक्ष विठ्ठलराव कोहाड, रायपूर ग्रामपंचायतच्या माजी उपसरपंच श्रीमती दिपाली कोहाड तसेच शाळेचे सचिव धर्मेंद्र कोहाड, सुहास कोहाड, प्रियदर्शनी इंदिरा गांधी ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य महेश सोनटक्के शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना घाटुर्ले, प्रीती कोहाड इत्यादी कार्यक्रमाला उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले होते. तसेच विठ्ठलराव कोहाड यांनी पालक व विद्यार्थ्यांना खेळाविषयीचे मार्गदर्शन केले. मुलांचा बौद्धिक शारीरिक मानसिक विकासासाठी अध्ययना बरोबरच खेळाचे सुद्धा धडे शाळेतून दिले पाहिजे असे कोहाड यावेळी म्हणाले.
यानंतर स्पर्धेमध्ये जिंकणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. यावेळी आपल्या पाल्याचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

