आशिष अबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मोबा. 8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे वारंवार लैंगिक शोषण करीत तिला गर्भवती करणाऱ्या आरोपी विरुद्ध वर्ध्याचे अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश व्हि.टी. सुर्यवंशी यांनी महत्वपूर्ण
कमलेश अशोक यावले वय २३ वर्ष रा. कन्नमवारग्राम याला १० वर्षाच्या सश्रम कारावासाची तसेच पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठाविण्यात आली आहे. वर्ध्याचे अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश व्हि.टी. सुर्यवंशी यांनी हा निर्वाळा दिला.
आरोपी कमलेशने पीडितेला सन २०१८ मध्ये लग्नासाठी विचारले होते. तेव्हापासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. कमलेशने पीडितेला १६ सप्टेंबर २०१९ रोजी खैरी डॅम येथे फिरायला नेले होते. तेथे त्याने पीडितेला लग्नाचे आमिष देत इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तो वारंवार पीडितेला भेटण्यासाठी त्याच्या शेतात बोलावत लैंगिक शोषण करत होता.
याची पीडितेच्या वडिलांना माहिती झाल्याने त्यांनी पीडितेची समजूत घालून तिला मामाच्या गावी पाठवले. पीडितेला मासिक पाळी न आल्याने तिने टेस्ट केली असता ती गर्भवती असल्याचे तिला समजले. याबाबत तिने कमलेशला माहिती दिली असता त्याने १० मे २००५ रोजी पुन्हा भेटण्यासाठी शेतात बोलावून न आल्यास आई वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिली.
पीडिता मामाच्या गावाहून आरोपीला भेटण्यासाठी गेली असता तेथे पुन्हा जबरदस्तीने पीडितेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडिता गर्भवती असल्याचे समजताच आरोपीने जबरदस्तीने गर्भपात होण्याच्या गोळया खाऊ घातल्या त्यामुळे पीडितेचा १८ मे २००५ रोजी घरीच अबॉर्शन झाले.
काही दिवसांनी पीडितेने लग्नास गळ घातली असता आरोपीने लग्न करण्यास नकार दिला. पीडितेने ही बाब तिच्या घरी सांगून कारंज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत उपनिरीक्षक जोस्ना प्रभु गिरी यांनी तपास केला.