मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेचे लक्ष लागलेल्या शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालात शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार विरोध सुरू झाला आहे. त्यामुळे हिंगणघाट शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख वर्धा यांच्या सूचनेप्रमाणे तसेच सतीश धोबे तालुकाप्रमुख हिंगणघाट यांच्या नेतृत्वात दि. 11 जानेवारी रोज सकाळी 11 वाजता स्थानिक कारंजा चौक शिवसेना कार्यालयाजवळ शिवसेनेचे १६ आमदार अपात्र बाबतच्या निर्णयाकडे लक्ष लागलेले होते. त्या निकालाचे वाचन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये वाचून दाखविला. ते १६ आमदार पात्र ठरविण्यात आले. सदर निकाल हा भाजपाच्या दबावाखाली घेण्यात आला असे सांगितले.
सदर निकाल हा कायद्यात बसत नाही. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियुक्ती केलेल्या शिवसेनेचे मुख्य प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती ही बेकायदेशीर ठरवली होती. तसेच राज्यपाल भगतसिंग कोशाहरी यांनी सुद्धा केलेली संपूर्ण कारवाई ही बेकायदेशीर ठरवली होती. व ट्रिब्युनल कोर्ट / लवादा म्हणून अपात्रतेचा निर्णय विधानसभेचे अध्यक्षकडे सोपविण्यात आला होता. परंतु तो निकाल शिंदे गटाकडून देण्यात आला. यावर या महाराष्ट्रातील जनता त्यांना कदापि माफ करणार नाही. लोकशाहीला काळीमा फासणारी ही दुर्दैवी घटना आहे. लोकशाहीचे हत्या होत असल्याचे दिसून आले म्हणून आम्ही हिंगणघाट शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्रच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निषेध करण्यात आले. त्यांच्या निषेधार्य घोषणा देऊन परिसर दनानून सोडला.
अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निषेध नोंदविण्याकरीता शहरातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी जसे शहर प्रमुख सतीश ढोमणे, उपतालुकाप्रमुख प्रकाश अनासाने, माजी नगरसेवक मनिष देवडे, शंकर मोहमरे, भास्कर ठवरे, माजी उपाध्यक्ष श्रीधर कोटकर, भोलाशिंग चव्हाण, शहर संघटक गजानन काटवले, सुनील आष्टीकर, दिलीप चौधरी, सुरेश चौधरी, संजय पिंपळकर, आशिष जयस्वाल, सुरेश चौधरी, प्रकाश घोडे शहर समन्वयक युवा सेना, नरेश गुडकरी, विजय कोरडे, श्याम बोरधरे, गोवर्धन शाहू, अनंता गलांडे, गौरव गाडेकर, दिनेश धोबे, बलराज डेकाटे, विलास चौधरी, अनिल लालटेनवार, हिरामण आवारी, मारोती अराडे, प्रशांत सुपारे, सतीश लोणारे, अनंता सोरटे, रणजित रहाटे, अनिल राऊत, मोहन जाधव, अशोक सोनटक्के, रमेश चतुर, विठ्ठल उगले, दिलीप आमगे, सुभाष काटकर, राजू शेवाळकर, राजू बोडे, लक्ष्मण कापकर, सुनील राजपूत, अजय शेडमाके, आनंद जगताप, शेख बबलू, तुळशिराम सातघरे, मोहन धन्वंत, विलास चौधरी, शंकर लोणबळे, आनंद वाघ, उमेश निरगुडे, शंकर भोमले, पांडुरंग निखाडे, रवी रंगारी व असंख्य शिव सेनीक उपस्थित राहून निषेध केला.