संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी मोबा.न.9923497800
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी निकाल काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचे बार्सिंग बाधून असलेले अनेक नेते एका दगडात घायाळ झाले आहे.
महाराष्ट्रातील आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लागणार. हा निकाल शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या विरोधात गेल्यास राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याची शक्यता सोशल मिडियावर व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. सोशल मिडियावर अजित पवार मुख्यमंत्री होणार असे अनेक मिस टाकण्यात आले होते. पण निकाल आल्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कऱ्यकर्याचा हिरमोड झाला आहे. आणि अजित पवार यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे.
कृतिशील विचारांचा गतिशिल नेता .! भावी मुख्यमंत्री नामदार अजिदादा पवार असा टेन्ट काल सोशल मीडियाच्या दिवसभर चालला होता. पण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्र प्रकरणी निकाल दिला आणि अजित पवार यांना मुख्यमंत्री पदी पाहणाऱ्या कार्यकर्ते मन सुन्न झाले.