प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- गंगाई बहुद्देशीय संस्था हिंगणघाट, जि. वर्धा तर्फे भारत विद्यालय वेळा येथे फातिमा शेख यांची जयंती साजरी करण्यात आली.
फातिमा शेख या एक भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसुधारक होत्या. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या त्या सहकारी होत्या. शेख या आधुनिक भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिकांपैकी एक असून त्यांनी फुले यांच्या शाळेत दलित मुलांना शिक्षण देण्याचे काम केले.
मियां उस्मान शेख या त्यांच्या भावाच्या घरी ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी वास्तव्य केले होते. फातिमा शेख यांच्यासह ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी दलित समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याची जबाबदारी घेतली.
अमेरिकन शिक्षक प्रशिक्षण संस्थेत त्यांची भेट सावित्रीबाई फुलेंशी झाली. १८४८ साली पुण्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची शाळा सुरू केली. या शाळेत फातिमा शेख शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. ही शाळा सुरू केल्यानंतर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना घर सोडावं लागलं होतं, त्यावेळी त्यांनी शेखच्या घरी वास्तव्य केले. फातिमा शेख यांनी सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्यानं शिक्षणाच्या कामाला सुरुवात केली. त्यांनी सर्व धर्म आणि जातीच्या मुलांना शिकवले.
अमेरिकन मिशनरी सिंथिया फरारकडून चालवल्या जाणाऱ्या शिक्षक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर त्यांची भेट सावित्रीबाई फुलेंशी झाली. फुलेंनी स्थापन केलेल्या पाचही शाळांमध्ये त्यांनी शिकवले. तसेच त्यांनी सर्व धर्म आणि जातीच्या मुलांना शिकवले. १८५१ मध्ये मुंबईत दोन शाळांच्या स्थापनेत शेख यांनी भाग घेतला. ९ जानेवारी २०२२ रोजी, गुगलने फातिमा यांना १९१ व्या जयंतीनिमित्त डूडलद्वारे सन्मानित केले.
शेख यांनी आयुष्यभर समतेसाठी काम केलं. त्यांनी दारोदार जाऊन शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्याचं काम केलं. फातिमा शेख यांनाही सावित्रीबाई फुले यांच्या प्रमाणे त्याकाळातील लोकांकडून त्रास झाला. शेख यांनी सत्यशोधक समाजाच्या कामात देखील सहभागी होत्या.
गंगाई बहुद्देशीय संस्था हिंगणघाट, जि. वर्धा या संस्थेमार्फत संस्था उपाध्यक्षा श्रीमती मंगला लोखंडे यांनी विस्तृत मार्गदर्शन करीत उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणार्थ प्रशिक्षण संदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्राचार्या श्रीमती मेघाताई हिंगमीरे व इतर शिक्षक योगिनी तळणकर मॅडम, तडस सर, खुळे मॅडम, घोडे सर, खैरकर सर, मुडे सर, मुळे सर, नंदनवर सर, लष्करे सर,भजभुजे सर, तिमांडे सर, विद्यार्थी तसेच गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.