प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्ह्यातील सेलू पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या चाणकी या गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळेत शिक्षणाचा बट्याबोळ सुरू असल्याचे चित्र दिसून येते आहे.
चाणकी ग्रामपंचायतचे उपसरपंच अतुल पन्नासे, शिक्षण समिती अध्यक्ष नितीन खैरकार आणि देशोन्नती वृत्तपत्राचे वार्ताहार सोमेश्वर ठाकरे यांनी दिनांक 10 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास या शाळेला अचानक भेट दिली असता यावेळी त्यांना असे आढळून आले कि, पहली ते चौथी पर्यंत शिक्षण घेत असलेले विध्यार्थी एका हॉल मध्ये बसवलेले होते व या चारही वर्गाच्या विद्यार्थांना एकच शिक्षिका शिकवीत होत्या. यावेळी या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले कि तुम्हाला चार हि वर्गाच्या विद्यार्थांना कोणत्या कुठल्या वर्गाचे अभ्यास शिक्षक शिकवीत आहे. ते तुम्हांला समजत आहे का? असे विचारले असता यावेळी विद्यार्थानी स्पष्ट सांगितले की आम्हाला शिक्षिका काय शिकवित आहे ते आम्हाला काहिच समजत नाही असे खळबळजनक उत्तर विद्यार्थ्यांनी दिले.
चाणकी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळेमधे पहिली ते सातवी पर्यंत शाळा असून शिक्षक फक्त तीनच आहे. सात वर्ग असून तिनच शिक्षक आहे. या शाळेची परिस्थती खूप बिकट आहे. पालक आपल्या मुलांना चांगल शिक्षण मिळावं म्हणून शाळेत पाठवतो. मुल शाळेमधे गेल्यानंतर त्यांना शिकविण्या करीता शिक्षक सुधा नाही मुल गोंधळ घालत शिक्षण घेत आहे. तरी शिक्षण अधिकारी यांनी हि परिस्थिती लक्षात घेता योग्य ती कारवाई करावी व सर्व विद्यार्थांना न्याय द्यावा असे अतुल पन्नासे उपसरपंच चाणकी यांनी महाराष्ट्र संदेश न्युजशी चर्चा करताना सांगितले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 7385445348