यशवंतराव चव्हाण सेंटर तर्फे मातृवंदन कार्यक्रम.
देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- शिक्षण समाजात रुजविण्यासाठी व त्यातून समाज निर्मिती करण्याकरिता युग स्त्री सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून मोठे समाजकार्य केले आहे. सावित्रीबाई फुले ह्याच स्त्री शिक्षणाच्या प्रनेत्या होत्या त्या काळातील अनेक प्रथा परंपरा यांना मोडून सावित्रीबाईंनी दगड धोंडे शेण चिखल सहन करून स्त्री शिक्षणाकरिता संघर्ष केला त्या युगस्त्री सावित्रीबाईं फुलेंच्या संघर्षमय विचारांचा विद्यार्थ्यांनी अंगीकार करावा असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण सेंटर नागपूर केंद्राच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त हिंगणा येथील स्व. देवकीबाई बंग विद्यालयात आयोजित मातृवंदन कार्यक्रमात सावित्रीआईंचा समताधिष्टीत विचार या विषयावर बोलतांना सुप्रसिद्ध वक्त्या, एकपात्री नाट्य कलावंत शैल जेमिनी यांनी केले. तर बुद्धिप्रमण्यवादी जिजाऊ या विषयावर बोलताना लेखिका डॉ. लीना निकम यांनी विद्यार्थ्यांनी नाविन्यतेची कास धरून वाचन, चिंतन, मनन करून बुद्धी तेजत ठेवावी. जिजाऊंसारखं बहुभाषांवर प्रभुत्व निर्माण करावं. परिस्थितीने गरीब असलो तरी मेंदू गरीब नसावा असे विचार मांडले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री रमेशचंद्र बंग होते तर यशवंतराव चव्हाण सेंटर नागपूर जिल्हा केंद्राचे अध्यक्ष महेश बंग, रवी देशमुख, डॉ. मंजुषा सावरकर, अरुणा बंग, प्राचार्य नितीन तुपेकर मुख्याध्यापिका आश्लेषा पारखी विचारपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे स्वागतपर भाषण महेश बंग यांनी प्रस्ताविक डॉ. मंजुषा सावरकर यांनी सूत्रसंचालन आनंद महाले यांनी तर आभार मुख्याध्यापक शशिकांत मोहिते यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता स्व. देवकीबाई बंग विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.