मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दि. १२ जानेवारी २०२४ रोजी संजय गांधी विद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सतीश वखरे वरिष्ठ पत्रकार कवी व लेखक हिंगणघाट यांनी “स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत आजच्या युवकांची कर्तव्ये” या विषयावर गुंफले. याप्रसंगी सतीशजी वखरे यांनी स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर आधारित छोट्या छोट्या कथांमधून विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश दिला. व आजच्या युवकांची स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत असलेली नेमकी कर्तव्य कोणती याबाबत मार्गदर्शन केले. तसेच राजमाता जिजाऊ यांनी शिवबाला कसे घडवले याबाबतही विद्यार्थ्यांना समायोचित मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रुग्णमित्र व सामाजिक कार्यकर्ते गजूभाऊ कुबडे उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात गजूभाऊ कुबडे यांनी युवकांनी रुग्णसेवेचा वसा घ्यावा आणि आपल्या नातेवाईकांना, गोरगरिबांना, दीनदुबळ्यांना शक्य ती मदत करावी असा मोलाचा संदेश दिला. यावेळी शाळेचे प्राचार्य मिलिंद मुळे यांनी युवक दिनानिमित्त स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांना वंदन करून व्याख्यानमालेची प्रस्तावना व उद्देश विशद केला. या कार्यक्रमाचे संचालन एच.आर. डंभारे यांनी केले. तर आभार के.जी.वांदिले यांनी मानले. अतिशय उत्साहात विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडून “स्वर्गीय दादासाहेब कोल्हे व्याख्यानमाला” पार पडली.
या व्याख्यानमालेसाठी फलक लेखनाचे काम प्रा. रवी आसुटकर, ध्वनी संयोजनाचे काम एम.व्ही. जवादे व के.डी.तडस यांनी केले. तर बैठक व्यवस्था व्ही.झेड. शेंडे व एन.बी.बेले यांनी केली. यावेळी सी.एम.डहाके व एन.डी.कोळसे यांनी देखील या कार्यक्रमासाठी सहकार्य केले.