अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो नं – ९८२२७२४१३६
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे असताना एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यामुळे १६ आमदार अपात्र प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असे स्पष्ट निर्देश दिले होते. परंतु अध्यक्ष नार्वेकर यांनी दिलेला निकाल लोकशाहीची हत्या करणारा आहे,असा स्पष्ट आरोप करीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसैनिकांनी निदर्शने करित निषेध केला.
शिवसेना जिल्हा संघटक प्रमुख अशोक झिंगरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुका प्रमुख नरेंद्र मोरे, सावनेर शहर प्रमुख सुभाष मछले, बबलू चौधरी, बाबा दुपारे, सुरेश केने, सचिन गजभिये, जयंत झिंगरे, पप्पी वाडीभस्मे, विकास झिंगरे, दिनेश दुबे, ललित श्रीवास्तव, रवी भस्मे, शंकर काकडे,चेतन हेलोंडे (युवा तालुकाप्रमुख), शुभम झिंगरे, राजा फाले, विकास घाटे, आरुष वर्मा, सुरज गव्हाने, अभिषेक सोनवणे, मिथुन ठाकरे, वासुदेव झलके, गजू माझरे, प्रमोद पांडे, विजय हेलोंडे, देवा चौधरी, आकाश निकोसे, राजू बर्वे, किशोर ताडेकर,अनिल बावनकुळे, मंगेश चव्हाण, बाळासाहेब काकडे, पियुष कासोगोत, विनोद लेडांगे, योगेश बोबडे इत्यादी कार्यकर्ते, शिवसैनिक उपस्थित होते.