जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली नियुक्ती.
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्धा जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, जिल्हा कार्याध्यक्ष प्रलय तेलंग यांचा प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धा जिल्हा उपाध्यक्ष पदी राजेश धोटे यांची नियुक्ती करण्यात आली.
राजेश धोटे यांनी नुकताच पाच महिण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष प्रवेश केला होता. त्यांनी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहले आहे. त्यांची ग्रामीण भागात पकड मजबूत असून त्यांच्या नियुक्तीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन ग्रामीण भागात मजबूत होईल.
नवनियुक्त राजेश धोटे यांनी रा.कॉ. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर श्रद्धा ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, वर्धा जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्तात पक्ष संघटन मजबुतीसाठी व पक्ष विस्तारासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रलय तेलंग, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अजय पर्बत, सुभाष चौधरी, तुषार थुटे उपस्थित होते.