मानव धर्माचे भव्य सेवक संम्मेलनाला हजारोच्या संख्येने सेवकांची उपस्थिती.
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिंदी (रेल्वे):- येथे परमात्मा एक सेवक मंडळ द्वारा आयोजित मानव धर्माचे भव्य सेवक संम्मेलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एक सेवक मंडळाचे नागपूर अध्यक्ष राजु मदनकर, उद्घाटक एक उपाध्यक्ष मनोहरराव देशमुख, मार्गदर्शक सुधाकर सोनटक्के, प्रमुख पाहुणे सिंदी शहराचे ठाणेदार वंदना सोनुने, वि.वि.सो. अध्यक्ष अशोक कलोडे, सभापती केसरीचंद खंगारे, जेष्ठ सेवक युगल अवचट उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे कार्य विशद केले. बाबा जुमदेवजी यांच्या जन्म नागपूर मधील एका गरीब कुटुंबात झाला त्यांचे वडील विठोबाजी विणकर होते आणि आई सरस्वतीबाई हे ग्रहणी होती. बाबा जुमदेवजींना बाळकृष्ण नारायण आणि जगोबा असे तीन मोठे आणि मारुती नावाचे धाकटा भाऊ होता. वडील विणकर असल्याने आणि त्यांची घरची आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्यामुळे बाबा जुमदेवजी आपले शिक्षण चौथीनंतर पुढे करू शकले नाही. 1938 मध्ये वयाच्या 17 वर्षी बाबा जुमदेवजी यांचे वाराणसीबाई यांच्याशी लग्न झालं काही कारणामुळे त्यांनी आपला वडिलोपार्जित विनकामाचे व्यवसाय सोडला आणि त्यांनी सेठ केसरीमल यांच्याकडे काही वर्ष सुवर्ण काम म्हणून काम केले. कालांतराने त्यांनी नागपूर महानगर पालिकेत कंत्राटदार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. कालांतराने बाबा जुमदेवजी ने परमात्मा एक सेवक नाम मानव धर्म मंडळाची स्थापना केली. त्यांनी व्यसनमुक्ती, सामाजिक ऐक्य तथा मानवी जीवनातील अंधश्रद्धा यावर मोठ्या प्रमाणात कार्य केले. त्यांचे काम आज महाराष्ट्र बाहेर अनेक राज्यात पोहोचले आहे असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी सेवक मंडळ पदाधिकारी सचिव सुरुज अंबुले, संचालक टिकाराम भेडारकर, सहसचिव मोरेश्वर गभने, संचालक वासुदेव पडोळे, कोषाध्यक्ष प्रविन उराडे, संचालक संजय महाकाळकर, संचालक फकिर जिभकाटे, संचालक विठ्ठलराव क्षिरसागर, मंगल सोनटक्के, विनोद गवळी, विजय नखाते, विनोद कातोरे, प्रभाकर काळबांडे, गणेश हांडे, विष्णु वाघमारे, श्रीराम भट्ट, तुषार महाकाळकर, सौरभ कातोरे, अतुल काळबांडे, उमेश आष्टनकर, हिरामन अवचट, मंगेश अवचट, नंदू भोयर, राकेश नखाते, भगवान वाघमारे, दिलीप रुहारकर, अमोल ढगे, हंसराज सुरकार, पुरुषोत्तम लांजेवार, हनुमान नखाते यांच्यासह सेवक मंडळाचे सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.

