प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो . 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- श्री गुरुदेव सेवा मंडळ व समस्त ग्रामवासी लाडकी द्वारा आयोजित श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 55 व्या पुण्यतिथी पर्वावर खंजरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या खंजरी भजन स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार राजुभाऊ तिमांडे यांनी केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हिंगणघाट बाजार समितीचे संचालक डॉ निर्मेशजी कोठारी, कार्यक्रमाचे अध्यक्ष वं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचारक ज्ञानेश्वरराव रक्षक, प्रमुख पाहुणे बाजार समितीचे संचालक मधुसूदनजी हरणे, सरपंच अमोलभाऊ बुरीले, तंटामुक्ती अध्यक्ष पुंडलीकराव बाळबुधे, पोलीस पाटील विशालभाऊ बुरीले, यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर व विचारावर उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कृष्णाजी पाहुणे, हरिदास भोकरे, भैय्याजी बांगडे, मोहनराव नौकरकार, मनोहर येनोरकर, राजु घुबडे, अनिलभाऊ नौकरकार, कोरडे साहेब, राहुल भोयर, मधुकर डेहणे, देशमुख साहेब, कुंडलिक उराडे, किशोर भलमे, प्रदीप हेमके तसेच मंडळाचे अध्यक्ष संजय बांगडे, उपाध्यक्ष माधव घुबडे, रमेश दारूनकर व मोठ्या प्रमाणात उपस्थित कार्यकर्ते, भजनी मंडळ व गावकरी मंडळी.