Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

राम मंदिराच्या अन्य भानगडीत पडू नका; राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना तंबी, ‘कारसेवकां’साठी चांगले उपक्रम राबवा

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 14, 2024
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0 0
0
राम मंदिराच्या अन्य भानगडीत पडू नका; राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना तंबी, ‘कारसेवकां’साठी चांगले उपक्रम राबवा
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- अयोध्येत येत्या २२ जानेवारीला राम मंदिराचा शिलान्यास होणार आहे. राम मंदिराच्या अन्य भानगडीत पडू नका, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना तंबी दिली. त्याचवेळी मंदिर होण्यासाठी ज्या कारसेवकांनी कष्ट घेतले. स्वप्न पाहिले. ते स्वप्न २२ जानेवारीला पूर्ण होत आहे. त्या कारसेवकांसाठी महाराष्ट्रभर आरत्यांसह जे जे चांगले उपक्रम राबवता येतील ते राबवा, असे आवाहन राज यांनी यावेळी केले.

राम मंदिराच्या शिलान्यासासंदर्भात कोणतेही चांगले उपक्रम राबविताना नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही राज यांनी कार्यकर्त्यांना केल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हाध्यक्षांचा मेळावा घेण्यात आला. त्यावेळी राज बोलत होते. व्यासपीठावर बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, नितीन सरदेसाई, बाबू वागस्कर, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, राजू उंबरकर आदी उपस्थित होते.

तुम्ही ज्या भागात राहता तेथील प्रश्न तुम्हाला माहिती आहे. ते प्रश्न कसे सोडावयचे हे ही तुम्हाला माहिती आहे. राजकारणाच्या पहिल्या टप्प्यावर तुम्ही पाऊल ठेवले आहे. सध्या सरपंच आहात. उद्या जिल्हा परिषदेचे सदस्य, आमदार, खासदार व्हाल. म्हणजे आतापासून स्वप्न पाहू नका,’ अशा शब्दांत राज ठाकरे यांनी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या.

ज्यांनी मतदान केले नसेल त्यांच्यावर सूड उगवू नका. त्यांनाही वाटले पाहिजे आपण यांना मतदान करायला हवे होते. त्यावेळी तुम्हाला त्या भागातून कोणीही हात लावू शळकणार नाही. मनसेचा झेंडा कोमी उखडू शकत नाही, असा विश्वास व्यक्त करायला राज विसरले नाहीत.

भाषणाच्या सुरुवातीलाच ‘मला यायला उशीर झाला, यापेक्षा खरे तर येऊच शकत नव्हतो. काल संध्याकाळपासून मला ताप आल्यासारखे वाटत होते. सकाळी उठल्यानंतर डोळे उघडत नव्हते. आताही अशक्तपणा अंगात आहे. पण तुम्ही इतक्या लांबून आला आहात. तुमचे दर्शन घेतल्याशिवाय मुंबईत परतणार नाही. म्हणून पाच दहा मिनिटे तुमच्याशी बोलायला आलो आहे,’ असे सांगत राज यांनी आपण आजारी असल्याचे सांगून टाकले. त्यामुळे कित्येक तास राज यांचे भाषण ऐकण्यासाठी आतूर झालेल्या कार्यकर्त्यांना अवघी काही मिनिटेच आपल्या नेत्याचे शब्द ऐकायला मिळाल्याने कार्यकर्त्यांची निराशा झाली.

Tags: महाराष्ट्र नवनिर्माण सेनामुंबईराज ठाकरे
Previous Post

सिंदी रेल्वे येथे परमात्मा एक मानव धर्माचे भव्य सेवक संम्मेलन, राकाँ पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांची प्रमुख उपस्थिती.

Next Post

श्री गुरुदेव सेवा मंडळ लाडकीच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 55 व्या पुण्यतिथी पर्वावर खंजरी भजन स्पर्धेचे आयोजन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
श्री गुरुदेव सेवा मंडळ  लाडकीच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 55 व्या पुण्यतिथी पर्वावर खंजरी भजन स्पर्धेचे आयोजन.

श्री गुरुदेव सेवा मंडळ लाडकीच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 55 व्या पुण्यतिथी पर्वावर खंजरी भजन स्पर्धेचे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In