प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो . 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातून एक हत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरातील इंदिरा गांधी वार्डातील पाण्याच्या टाकी जवळ 9 जानेवारी मामा आणि भाच्याचा शुल्लक वादातून एका भास्याने आपल्याच मामाची हत्या केल्याच्या घटनेने शहरात खळबळ माजली आहे. प्रकाश मसराम असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून खुशाल राजू तुमडाम असे आरोपीचे नाव आहे.
मामा प्रकाश आणि भाचा खुशाल यांच्यात शुल्लक कारणावरून वाद झाला वादाचे पर्यवसान हाणामारी झाली आणि बघता क्षणी भाच्याने मामाच्या डोक्यावर विटेने जोरदार प्रहार करून त्याला गंभीररित्या जखमी केले. डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने भाच्याने उपजिल्हा रुग्णालयात हिंगणघाट येथे उपचारासाठी दाखल केले यावेळी डॉक्टरांना दुचाकीवरून पडून जखमी झाल्याची खोटी माहिती दिली.
जखमी प्रकाश याची प्रकृती गंभीर असल्याचे त्याला पुढील उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी सुध्दा भाच्याने खोटी माहिती देत दिशाभूल केली सेवाग्राम येथे सुद्धा प्रकृती नाजूक असल्याने पुढील उपचाराकरिता नागपूर येथील एम्स रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना दोन दिवसांनी प्रकाश मसराम यांचा 13 जानेवारीला मृत्यू झाला. मात्र भाचा खुशाल राजू तुमडाम याने हानामारीत विट मारल्याची कोणालाही माहिती दिली नाही.
जेव्हा भाचा खुशाल याने मामा प्रकाश याच्या डोक्यावर विट मारल्याची घटना मृत्यक प्रकाश याच्या मुलाने पाहिली होती. मात्र या घटनेची वाच्यता केली तर जीवे मारण्याची धमकी खुशाल राजु तुमडाम ने दिली होती यामुळे या घटनेची माहिती मुलाने ही माहिती कुणालाही सांगितली नाही. शेवटी मुलाने हा घटनाक्रम आपल्या आईला सांगितला यावेळी मृत्यकाची पत्नी श्रीमती कांताबाई प्रकाश मसराम हिने यासंबंधी हिंगणघाट पोलिस स्टेशन गाठून आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी खुशाल राजू तुमडाम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन अटक केली घटनेची गांभीर्य पाहता अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कवडे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडीत याच्या निर्देशनात पोलिस निरीक्षक मारुती मुळूक यांच्या मार्गदर्शनात पीएसआय मिश्रा हिंगणघाट डि.बी प्रमुख प्रविन देशमुख आणि पथकानी कारवाई केली असून पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे.

