सागर शिंदे, वाशिम जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम:- मालेगाव तालुक्यातील अवघ्या 300 लोकसंख्या असलेल्या छोट्याश्या गोकसावंगी या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील एकनाथ खंडागळे यांचे चिरंजीव तसेच मालेगावच्या नाना मुंदडा विद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ योगेश एकनाथ खंडागळे याने आय.एन.आय, एस.एस, डी.एम. नेफ्रॉलॉजी परीक्षेमध्ये भारतातून प्रथम म्हणजेच ऑल इंडिया रँक -1 येण्याचा मान पटकावलाय आहे.
योगेश यांनी वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द, चिकाटी, परीश्रम व कठोर मेहनतीच्या जोरावर अवघ्या वयाच्या 28 व्या वर्षी हे यश संपादन केले आहे. डॉ.योगेश खंडागळे याचा जन्म गोकसावंगी या ग्रामीण भागात एका शेतकरी कुटुंबात झाला असून त्याचे प्राथमिक शिक्षण ग्रामीण भागात झाले..एम.बी. बी. एस. चे शिक्षण नागपूर येथील इंदिरा गांधी मेमोरिअल हॉस्पिटल मध्ये तर एम. डी. मेडिसिन चे शिक्षण के.इ.एम (KEM) हॉस्पिटल मुंबई येथून पूर्ण केले.
डी. एम. नेफ्रॉलॉजीचे शिक्षण घेण्यासाठी योगेशची पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, चंदीगड येथे निवड झाली आहे. डॉ. योगेश यांनी आपल्या यशाचे श्रेय आई वडील व गुरुजनांना दिले आहे. डॉ योगेश यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.