संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी
मोबा. न 9923497800
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- तालुक्यातील मौजा कळमना येथील राष्ट्रसंत तुकडोजी गुरूदेव सेवा मंडळ तथा ग्रामवासीयांच्या वतीने आयोजित आणि राष्ट्रसंताच्या ५५ व्या पुण्यस्मरणानिमित्य ठेवलेल्या ग्राम सम्मेलन तथा भव्य खंजेरी भजन स्पर्धेच्या उद्घाटनीय कार्यक्रमास उपस्थित राहून देवराव भोंगळे यांनी कळमना वासीयांशी संवाद साधला. या प्रसंगी सामाजिक व शेतकी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्याचा सत्कारमूर्तींचे यावेळी त्याचा हस्ते सत्कारही करण्यात आले.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे राष्ट्रकार्य आणि ग्रामगीतेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामोन्नती साठी मांडलेलं अभ्यासपूर्ण विवेचन उन्नत व आदर्श गावाच्या निर्मितीसाठी वस्तुपाठ आहे. वंदनीय महाराजांच्या विचार आचरणात आणून ग्रामनाथाने कल्याण साधण्याची आज गरज आहे. अशी भावना याठिकाणी देवराव भोंगळे यांनी बोलतांना व्यक्त केली.
यावेळी मंचावर सरपंच नंदकिशोर वाढई, प्रा. दौलत भोंगळे, निलेश वाढई, पो. पा. बाळू पिंगे, मारोती साळवे, दिलीप गिरसावळे, बाबुराव मडावी, विनोद नरेन्दुलवार, ग्रा. प. सदस्य दिपक झाडे, अर्जुन पायपरे, मंगेश ताजणे, सौ. माधुरी भोंगळे यांचेसह मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती.