चोपडा विश्वास वाडे प्रतिनिधी
चोपडा:- येथील युवा चित्रकार अनिलराज पुनमचंद पाटील यांचे मुंबई येथे होणाऱ्या अंतरराष्ट्रीय पातळीच्या स्पर्धा व प्रदर्शन आर्ट ऑफ हुमिनिटी इनवोटीव गणेशा यात निवड झाली आहे. पाटील अनिलराज यांनी आता पर्यंत वर्षभरात तब्ब्ल ६ अंतरराष्ट्रीय पातळीचे पुरस्कार मिळवले आहे. दरवर्षी होणाऱ्या गणेश उत्सवानिमित्त हे चित्र प्रदर्शन भरवले जाते. या वेळी पाटील यांनी श्री गणेशाचे सूपकर्न हे चित्र कृष्ण धवल पेन इंक या माध्यमात रंगविले आहे. या चित्रात गणपती हा कमळाच्या फुलावर विराजमान आहेत गणेश यांचे हे नैसर्गिकच रूप दाखवलं आहे. त्यात पंच तत्वाचा समावेश आहे अग्नी, वायू , जल, आकाश, पृथ्वी असे घटक दाखवले आहे. या प्रदर्शन मध्ये एकुण १०४ चित्राचा समावेश आहे. हे प्रदर्शन रसिकांना येत्या २५ सप्टेंबर पासून तर १ ऑक्टो २०२२ पर्यंत सुरु असणार आहे.
यात सर्व कलाकारानी श्री गणेशचे खूप सुंदर अशी वेग वेगळी चित्र रेखाटली आहे. पाटील अनिलराज हे चोपडा येथील चित्रकला महाविद्यालयाचे माझी विद्यार्थि आहेत त्याना प्राचार्य राजेंद्र महाजन विनोद पाटील सर, संजय नेवे सर व सुनील बारी सर या सर्वांचे आवडते विद्यार्थि आहेत. पाटील अनिलराज यांना पुणेचे चन्द्रशेखर कुमावत याचें नेहमी मार्गदर्शन असते पाटील अनिलराज याचें सर्वत्र कौतुकच होत आहे.