प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो . 9284981757
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन वर्धा, दि.19: या वर्षात लोकसभा विधानसभेच्या निवडणूका असून 18 ते 19 वर्षे पुर्ण झालेल्या नवयुवकांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करुन आगामी निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
वर्धा येथील विकास भवन येथे निवडणूक साक्षरता मंडळाची स्थापना, महाविद्यालयांचे प्राचार्य, वर्शिप अर्थ फाऊंडेशन व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यात सामंजस्य करार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनील गावीत, निवडणूक नायब तहसिलदार अतुल रासपायले, वर्शीप अर्थ फाऊंडेशनचे सीइओ तेजस गुजराथी, राज्य समन्वयक अल्ताफ पीरजादे, जिल्हा समन्वयक मिनाक्षी रामटेके, स्वीपचे नोडल अधिकारी सचिन जगताप आदी उपस्थित होते.
हे वर्ष निवडणुकांचे असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक व प्राचार्य यांची भुमिका अतिशय महत्वाची आहज. त्यांच्यामार्फत नवमतदार नोंदणी, मतदानाकरीता सहकार्य अपेक्षित आहे. निवडणूक साक्षरता मंडळाच्यावतीने विविध उपक्रम, मतदार नोंदणी तसेच मतदान जनजागृती असे विविध कार्यक्रम प्रभावीपणे राबविले जावून मतदानाच्या टक्केवारीमध्ये निश्चित वाढ होईल, असे राहुल कर्डिले म्हणाले.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्या तील 21 महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता मंडळाची स्थापना करण्यात आली असून सदीच्छा दुत नियुक्त करण्यात आले आहे. साक्षरता मंडळांतर्गत संपुर्ण कार्यवाही करण्याकरीता महाविद्यालयीन स्तरावर नोडल अधिका-यांची सुध्दा नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी 21 महाविद्यालयांचे प्राचार्य, वर्शीप अर्थ फाऊंडेशन व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यात मतदार जनजागृतीच्या अनुषंगाने सामंजस्य करार करार करुन त्यावर स्वाक्षरी घेण्यात आली.
यावेळी कुंभलकर समाजकार्य महाविद्यालय, बापुराव देशमुख कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, अनिकेत समाजकार्य महाविद्यालय, जानकीदेवी बजाज कॉलेज ऑफ सायन्स, रुरल इंस्टीट्यूट ऑफ ॲग्रीकल्चर, डॉ.आर.जी भोयर आर्ट्स, कॉमर्स व सायन्स कॉलेज, बजाज कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर, इंस्टीट्यूट ऑफ फार्मास्यूटीकल एज्युकेशन, यशवंत महाविद्यालय, जी.एस. कॉलेज ऑफ कॉमर्स, श्री समर्थ आर्ट्स ॲड कॉमर्स कॉलेज आष्टी, स्व.वसंतराव कोल्हटकर आर्ट्स कॉलेज रोहणा, यशवंत महाविद्यालय वर्धा, प्रियदर्शनी महिला महाविद्यालय वर्धा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, लोक महाविद्यालय, डॉ.आर.जी. भोयर इंस्टीट्यूट ऑफ फार्मास्यूटीकल एज्युकेशन अँड रिसर्च इंस्टीट्यूट वर्धा, श्री. साईबाबा लोकप्रबोधन आर्ट्स कॉलेज वडनेर, इंद्रप्रस्थ न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायंस कॉलेज नालवाडी, आर्ट्स कॉमर्स अँड सायंस कॉलेज आर्वी व डॉ. आर.जी.भोयर इंस्टीट्यूट ऑफ फार्मसी वर्धा यांचे प्राचार्य, नोंडल अधिकारी व सदिच्छा दूत उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतुल रासपायले यांनी केले तर संचालन व आभार डॉ. संदिप पेठारे यांनी मानले.