🖋️ विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
अहमदनगर:- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने वीस दिवस अवैध दारू अड्ड्यांवर कारवाईची विशेष मोहीम राबविली. त्यात 603 दारू अड्डे उद्ध्वस्त करून 603 आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल केले. तर 49 लाख 36 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करून नष्ट केला. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या सूचनेनुसार 15 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे प्रभारी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी अवैध दारू विक्रेत्याविरुद्ध विशेष मोहीम राबविली. सर्व पोलिस ठाण्यांच्या अधिकार्यांनी अवैध दारू, गावठी हातभट्ट्यांचा शोध घेऊन 542 ठिकाणांवर छापे घातले 542 आरोपींना ताब्यात घेऊन 27 लाख 8 हजार 913 रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 61 ठिकाणंवर छापे मारून 69 आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडून 22 लाख 27 हजार 285 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. एकूण 603 ठिकाणांवर छापे घातले व 603 आरोपींना ताब्यात घेऊन 49 लाख 36 हजार 99 8 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला. ही कारवाई सर्व पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व एलसीबीचे पोलिस निरीक्षक अनिल कटके, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब काळे, बाळासाहेब मुळीक, संदीप पवार, पोलिस नाईक शंकर चौधरी, पोलिस कॉन्स्टेबल रंजित जाधव, रवींद्र घुंगासे, राहुल सोळुंके, संदीप दरंदले, लक्ष्मण खोकले, पोलिस कॉन्स्टेबल शिवाजी ढाकणे, रविकिरण सोनटक्के, संदीप घोडके, सचिन आडबल, ज्ञानेश्वर शिंदे, संभाजी कोतकर देवेंद्र शेलार, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे, विशाल दळवी, दीपक शिंदे, विजयकुमार वेठेकर, दत्तात्रेय हिगडे, मच्छिंद्र बर्डे, विश्वास बेरड आदींच्या पथकाने केली.