खेळातून सांघिक भावना वाढीस लागुन शारीरिक व्यायाम होतो: कें.प्र.कुसनाके
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- पंचायत समिती अहेरी अंतर्गत महागाव व बोरी केंद्राच्या क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेचे आयोजन संयुक्तरित्या करण्यात आले . या क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जि.प.सदस्या सुनिता कुसनाके यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रुपेश सिडाम हे होते तर प्रमुख उपस्थिती सरपंच सायलु मडावी, सरपंच रेणुका आत्राम,सरपंच मिना वेलादी,उपसरपंच पराग ओल्लारवार, उपसरपंच सुरेश गंगाधरीवार, उमा मडगुरवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सर्वश्री मल्लेश पानेम, अशोक कोरेत, सीमा मडावी, भिमराव दुर्गे, राजन्ना संगर्तीवार, हनमंतु कुळमेथे, रोशनी दुर्गे, दिवाकर चटारे,संजय सुंके, अनुसुर्या निखाडे यांची होती.
यावेळी विद्यार्थीच्या सुप्त गुणांना चालना मिळावी व त्याना एक व्यासपीठ मिळावे म्हणून जिल्हा परिषद गडचिरोली शिक्षण विभाग यांचेकडून जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थीच्या क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.या स्पर्धेतून विद्यार्थीच्या सुप्त गुणांना चालना मिळुन त्यांचेत सांघिक भावना निर्माण होते व शारीरिक व्यायाम होऊन शारीरिक विकास होतो.तसेच त्यांचेत स्पर्धा निर्माण होते हाच या स्पर्धा घेण्यामागील मुख्य उद्देश आहे म्हणून सर्व शाळांनी यात आपल्या विद्यार्थीना सहभागी करून घ्यावे असे आवाहन केंद्र प्रमुख लक्षी कूसनाके यांनी केले.त्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.
याप्रसंगी सरपंच रेणुका आत्राम, महागाव केंद्राचे केंद्र प्रमुख भास्कर उईके, जेष्ट शिक्षक प्रकाश दुर्गे,मुख्याध्यापक राजु आत्राम, यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमाचे महत्त्व सांगीतले. बालकांना बाल वयातच जर खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड निर्माण झाली व त्याना व्यासपीठ मिळाले तर पुढे हेच बालके मोठे खेळाळू व कलाकार होऊ शकतात. कमी कालावधीत आपण ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडीत आहोत यासाठी टेकुलगुड्डा ग्रामस्थाचे आभार केंद्र प्रमुख भास्कर उईके यांनी मानले.
या दोन दिवसीय चालना-या क्रिडा स्पर्धेत कबड्डी, खो-खो, रिले, हाॅलीबालया खेळासह विवीध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात दोन्ही केंद्रातील दिडशेचे वर विद्यार्थीच सहभाग आहे. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक केंद्र प्रमुख भास्कर उईके यांनी केले तर संचालन अनिश बंडावार यांनी केले तर आभारप्रदर्शन संतोष नलगुंटा यांनी केले. या क्रिडा स्पर्धा यशस्वीतेसाठी राजु आत्राम, बापु आत्राम तसेच दोन्ही केंद्राचे मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समीती व टेकुलगुड्डा ग्रामस्थाचे सहकार्य मिळाले.