उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये ‘डीपा क्लीन ड्राइव्ह’ अर्थात सखोल स्वच्छता मोहीम अंतर्गत शहरातील धार्मिक स्थळे, प्रभाग, नदी परिसर नाले, शहरातील मुख्य रस्ते, बगीचे,उद्याने सार्वजनिक शौचालये आदी भागांची स्वच्छता करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने कोणीही रस्त्यांवर कचरा टाकताना आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांनी दिला आहे.
अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना तसेच व्यावसायिक प्रतिष्ठानधारकांनी अकोला महानगरपालिका प्रशासनानेमार्फत राबविण्यात येणार्या मोहीमे नंतर स्वच्छ झालेल्या भागांमध्ये कचरा टाकणार्यांविरूध्द मनपा प्रशासनाव्दारा दंडात्मक करण्यात येणार आहे. तरी शहरातील नागरिकांनी आपल्या घरात आणि प्रतिष्ठानात निघणारा ओला व सुका कचरा वेग-वेगळा गोळा करून परिसरात इतरत्र न टाकता फक्त मनपाच्या कचरा घंटा गाडी मध्येच टाकावा.असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना कचरा घंटा गाडी संदर्भात समस्या असल्यास त्यांनी अकोला महानगरपालिकेच्या १८००२३३५७३३ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी किंवा मनपा उपायुक्त गीता ठाकरे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.