✒️ पंकेश जाधव, पुणे जिल्हा प्रतिनिधी
पुणे:- दि. ०८ सप्टेंबर रोजी गजानन श्रीकांत ओगले, वय ४५ वर्षे, रा. फ्लॅट नं. ५०३, बिल्डींग बी / ४, ग्रिनफील्ड सोसायटी, मासुळकर कॉलनी, पिंपरी पुणे त्यांचा मुलगा आदीत्य वय ०७ वर्षे, हा सोसायटीमध्ये खेळत असतांना कोणीतरी अज्ञात इसमाने त्याला पळवून नेलेबाबत फिर्याद दिल्याने गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन पोलीस आयुक्त व अप्पर पोलीस आयुक्त यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून गुन्हे शाखेकडील सर्व पथके तसेच पोलीस स्टेशन यांच्या एकूण १० पथके तयार करुन त्यांना सुचना देवून तपास सुरु करण्यात आला.
सर्व संशयित ठिकाणांची तपासणी सुरु करण्यात आली. रात्री १.०० वा. चे सुमारास फिर्यादी गजानन ओगले यांच्या मोबाईलवर अज्ञात इसमाने व्हाट्सअप मेसेज करून २० कोटी रक्कमेची मागणी केली व सदर इसम उत्तरप्रदेश मधील असल्याचे भासविले. अल्पवयीन मुलाचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे व्हाट्सअप मेसेजची तपासणी केली असता सदरचा नंबर उत्तरप्रदेश येथे रजिस्टर होता त्याअनुषंगाने तपास करीत असतांना सदरचा इसम चिखली येथे बिगारी काम करत होता. त्याचेकडे तपास केला असता त्याचे मोबाईल नंबरचा वापर करुन अज्ञात आरोपीनी मेसेज केला होता असे निष्पन्न झाल्यामुळे या तपासामध्ये सायबर मधील तज्ञ अधिकारी. अंमलदार यांनी अतिशय प्रचंड मेहनत करून तांत्रीक विश्लेषण केले त्यावरुन आरोपी निष्पन्न केले व त्वरीत गुन्हे शाखेच्या पथकांनी दोन आरोपींना ताबोडतोब ताब्यात घेतले.
यातील आरोपी मंथन किरण भोसले वय २० वर्षे रा. फ्लॅट नंबर १०२, बी ४ बिल्डींग, ग्रीन फील्ड सोसायटी, अजमेरा मासुळकर कॉलनी पिंपरी हा नेहमी सोसायटी मधील सदस्यांना व त्यांचे काही मुलांना त्रास देत होता. म्हणून गजानन ओगले यांनी त्याला बयाचवेळा रागविले होते. त्यामुळे त्यांचेमध्ये कौटूंबिक वाद झाले होते, याबाबत सोसायटीमध्ये हा विषय चर्चेला गेल्यामुळे तो राग मनात धरुन ओगले यांना धडा शिकविणेसाठी व त्यांचेकडून पैसे मिळविणेसाठी मंथन भोसले याचा साथीदार अनिकेत श्रीकृष्ण समदर वय २१ वर्षे रा. बी ७०५, साईकृपा हौसिंग सोसायटी, घरकुल चिखली याचेशी संगनमत करून गजानन ओगले यांचा अल्पवयीन मुलगा आदीत्य याचे सोसायटीचे पार्कींग मधुन अपहरण करुन गंथन भोसले याची फोरव्हीलर गाडीमध्ये ओढले असता त्याने मोठ्याने आरडा ओरड केल्यामुळे आरोपीने त्याचे नाक-तोंड दाबुन जिवे ठार मारले व त्यानंतर मुलाची बॉडी एका प्लास्टीक पोत्यामध्ये बांधुन एमआयडीसी परिसरातील एका पडीक बिल्डींगचे टेरेसवर नेवून टाकली. सदर गुन्हयामध्ये आरोपीत नामे १) मंथन किरण भोसले वय २० वर्षे रा. फ्लॅट नंबर १०२, बी ४ बिल्डींग, ग्रीन फील्ड सोसायटी, अजमेरा मासुळकर कॉलनी पिपरी व २) अनिकेत श्रीकृष्ण समदर वय २१ वर्षे रा. बी ७०५, साईकृपा हीसिंग सोसायटी, घरकुल चिखली यांना अटक करण्यात आली असून गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट २ कडून सुरु आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. श्री संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री काकासाहेब डोळे, पोलीस उप आयुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. प्रशांत अमूलकर, सहा. पोलीस आयुक्त सो पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ युनिट २ युनिट ४ गुंडा विरोधी पथक, अनैतिक मानवी प्रतिबंधक सेल, इतर गुन्हे शाखेचे अधिकारी / अंमलदार तसेच पोलीस स्टेशन पिपरीचे अधिकारी / अंमलदार यांनी शोध घेणेमध्ये मोलाचे योगदान केले. सर्वात महत्वाचे सायबर सेलचे सपोनि पानमंद, अंगलदार प्रशांत सईद व शाम बाबा यांनी अतिशय जलद व कौशल्यपूर्ण तांत्रीक विश्लेषण केल्यामुळे गुन्हे शाखेने हा गुन्हा तात्काळ उघडकीस आणला आहे.