युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ नागपुर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नागपुर:- जिल्हातील कळमेश्वर पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या विदर्भाचे पंढरपूर धापेवाडा येथे नुकताच विदर्भ शाहीर कलाकार परिषदेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही विदर्भ शाहीर कलाकार परिषद तालुका कळमेश्वर तर्फे तिळगुळ व स्नेह समारोह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मनीष भिवगडे हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष अलंकार टेंभुर्णे त्याचप्रमाणे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष रमेश मानकर, विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे नागपूर जिल्हाध्यक्ष दयाल कांबळे, वृद्ध कलावंत मानधन समितीचे सदस्य बाबा दुपारे, जिल्हा परिषदच्या माजी सदस्य सौ. अरुणा मानकर होत्या. शाहीर अशोक लोणारे, शाहीर रामदासजी मानेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत तिळगुळ कार्यक्रम पार पडला.
गेल्या अकरा वर्षापासून वारामायमठ धापेवाडा येथे विदर्भ शाहीर कलाकार परिषद तर्फे तिळगुळ समारोह घेण्यात येतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून कलावंतांना एकत्रित करणे, कलावंतांच्या समस्या समजावून घेणे कलावंताची समोरची दिशा ठरवणे याविषयी सांगोपांग चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाचे संचालन विदर्भ शाहीर कलाकार परिषदेच्या केंद्रीय सदस्य निशा खडसे यांनी केले तर प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस अरुण वाहने यांनी केले.