संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी मोबा.न9923497800
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- तालुक्या अंतर्गत येणारे विरूर पोलीस स्टेशन येथून आंध्रप्रदेश बॉर्डर अंदाजे 30 ते 35 किलोमीटर आहे म्हणून त्या भागातील कापूस व तनीसच्या महिन्द्रा पिकअप व बोलेरो पिकअप इत्यादी अशा वाहणांच्या सारख्या फेऱ्या होत राहतात म्हणून विरूर पोलीस स्टेशन येथील वाहतूक शाखेचे कर्मचारी एका गैर पोलीस इसमाला सोबत घेऊन त्या गाड्याची वसुली करत असल्याची माहिती वाहन चालका कडून बोलण्यात येत आहे.
सदर गैर इसम हा धानोरा या गावाचा रहवासी असून विरूर पोलीस स्टेशनकडे येणार्या प्रत्येक गाड्यांची माहिती देतो व आवश्यकता पडल्यास वाहतूक शाखेचे कर्मचारी त्या इसमाला पोलीस खाजगी वाहनाचे वाहन चालक म्हणून सुद्धा वापरतात जर वाहतूक शाखेचे कर्मचारी कुठल्या कामात व्यस्त असल्यास या गैर पोलीस इसमाला वसुलीसाठी पाठवतात व तो इसम प्रत्येक गाडी कडून चालणच्या नावाने वसुली करतो.
धानोरा टी पॉईंट -सिदेश्वर जुना आरटीओ पॉईंट – अनुर अंतर गाव पॉईंट व पोलीस स्टेशन समोर ठाणेदारच्या आदेशाने वाहतूक शाखेचे कर्मचारी व तो गैर पोलीस इसम वसुली करिता रोज वेगळा दिवस निवळतात. जर ते वाहन रोज रोज येणे जाणे करत असेल तर तो इसम महिन्याचे एवढे पैसे लागते अशी मागणी करतॊ व त्याचा महिना ठरवतो एका शिपाई पेक्षा किंव्हा जमादार पेक्षा त्या इसमाच्या नावाने विरुर परिसर गाड्या चालतात.
आतां शेतकरी आपला माल विकायला कोणा कोणाला पैसे देणार ही चर्चा विरूर स्टेशन ह्या परिसरात सुरु आहे व ह्या भागात बाहेरून येणारे जाणारे माल वाहक गाडयाचे वाहन चालक चर्चा करतांना आदळून आले की आमचे खर्चाचे पैसे तर हे पोलीस खाऊन टाकतात तर यावर वरिष्ठ अधिकाऱ्यानी लक्ष द्यावे अशी मागणी वाहन चालक करीत आहे.