दिलीप दहागावकर, धाबा तोहगाव प्रतिनीधी
मो नं 7498073728
गोंडपीपरी:- तालुक्यातील चेकबोरगांव येथे काल दिनांक १० सप्टेंबर २०२२ रोज शनिवारला गोंडपीपरी तालुका काँग्रेस अनु.जाती विभाग अध्यक्ष गौतम झाडे यांना सायंकाळी सातच्या सुमारात शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली.मारहाणीत गौतम झाडे जखमी झाले.गौतम झाडे यांच्या तक्रारीवरून चेकबोरगांवातील आठ जणांवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार दिनांक १० सप्टेंबर २०२२ रोज शनिवारला गावांत गणपती विसर्जन होते.ग्रामपंचायत जवळ असणाऱ्या आकाश दुर्गे यांच्या पान टपरी जवळ असलेल्या झाडाखालील सिमेंट बेंच वर सहकाऱ्यांसह गप्पा करत असतांना फक्त राजकीय प्रतिस्पर्धी गटाचे असल्याने रागाच्या भरात जातीवादक शिवीगाळ करत जाणिकराम झाडे, जोगेश्वर उपासे, नितीन झाडे, गणेश झाडे, सुनील पोरटे, संदीप शेंडे, गंगाराम राऊत, गणेश भोयर, संजय कोमावार यांनी मारहाण केली.
गौतम झाडे यांच्या तक्रारीवरून आठ जणांवर १४३, १०९, ३२३, ५०४, ५०६ भादवी सहकलम (१) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. संजय कोमावार यांच्यावर मारहाण प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला.
पोलीस उपविभागीय अधिकारी एम.इंगळे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत घटनेची माहिती जाणून घेतली. पुढील तपास उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक जीवन राजगुरू पीएसआय धर्मराज पटले करीत आहेत.