उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- संपूर्ण देशभरात केंद्र सरकारच्या वतीने मोदी सरकार विकसित भारत संकल्प रथयात्रा गावागावात सुरू करण्यात आली आहे. या रथयात्रेवरील मोदी सरकार या नावाला विरोध करत त्याऐवजी भारत सरकार का नाही? असे प्रश्न संबंधित अधिकाऱ्यांना करत या रथयात्रेला उरळ बु व उरळ खु येथे तिघांनी काळे झेंडे दाखवले याप्रकरणी उरळ पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन सोडले.
बाळापुर तालुक्यातील उरळ खुर्द व उरळ बुद्रुक येथे सोमवार ता. २२ रोजी सकाळी विकसित भारत संकल्प रथयात्रा येऊन पोहोचली केंद्र सरकारच्या विविध योजना या जनसामान्यांपर्यंत पोहोचवाव्यात व केंद्राच्या कामांची माहिती नागरिकांन व्हावी यासाठी ही संकल्प यात्रा सुरू करण्यात आली आहे. मात्र य संकल्प यात्रेच्या गाडीवर मोदी सरकार असा उल्लेख करण्यात आल आहे. त्यामुळे स्थानिक आंदोलक शेतकरी पुत्र गोपाळ पोहरे तसेच् बाळापूर तालुका काँग्रेस कमिटीचे दीपक पोहरे, प्रवीण माळी य तिघांनी संबंधित अधिकाऱ्यांना मोदी सरकार यांनी भारत सरकार अस उल्लेख करण्यात यावा अशी मागणी केली.
मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. आम्ही काहीच करू शकत नाही असे सांगितले. यावेळी काळे झेंडे दाखवून विकसित भारत संकल्प रथयात्रेला कार्यकर्त्यांनी यावेळी निषेध केला. उरळ पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतले व काही वेळाने सोडून दिले.