प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो . 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तरुणीला 13.50 लाखांचा फसवणुक करण्यारा आरोपींला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. गणेश गोटेफोटे असे आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता मंगळवारपर्यंत (ता. 23) पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्याच्या वर वर्धा जिल्ह्यासह भंडारा, गोंदिया येथे फसवणुकीचे गुन्हे दाखल असून इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार सेवानिवृत्त पोलिस रवींद्र गुजरकर व मयूर दिलीप वैद्य हे रेल्वेत मोठे अधिकारी होते. फिर्यादीच्या मुलीला रेल्वेत टीसी म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष दिले होते. या आमिषाला बळी पडल्याने फिर्यादीने नोकरीसाठी 13 लाख 50 हजार रुपये वेळोवेळी दिले. यासाठी खोटे नियुक्तीपत्र, खोटी वैद्यकीय तपासणी इतकेच नाही तर प्रशिक्षणही खोटे दिल्याची तक्रार सुनिता भास्कर देहारे (रा. नालवाडी) यांनी वर्धा पोलिस ठाण्यात दिली होती.
आरोपी विरुद्ध तक्रार दाखल करून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर फसवणूक झाल्याचे निष्पन्न होताच रवींद्र गुजरकर आणि मयूर वैद्य (रा. बल्लारशा) यांना यापूर्वीच अटक केली होती. या गुन्ह्याचा मास्टरमाईंड’ असलेला गणेश गोटेफोडे हा फरार होता. अखेर वर्धा पोलिसांनी त्याला अटक केली. हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर भंडारा गोंदिया वर्धा येथे फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.