Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home ठाणे

उपवन घाटाला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांचे नाव द्या: आमदार प्रताप सरनाईक यांची ठाणे पालिकेकडे मागणी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 24, 2024
in ठाणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
उपवन घाटाला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांचे नाव द्या: आमदार प्रताप सरनाईक यांची ठाणे पालिकेकडे मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांचे नाव देण्याची मागणीसाठी धनगर प्रतिष्ठानचा पाठपुरावा

नितीन शिंदे ठाणे जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन ठाणे:- ठाणे शहरातील प्रसिद्ध तलावांपैकी एक असलेल्या उपवन तलावाकाठी बांधलेल्या भव्य दिव्य घाटाचे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन झाले. स्थानिक ओवळा – माजिवडा मतदार संघाचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून झालेल्या या घाटाला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांचे नाव देण्याची मागणी धनगर प्रतिष्ठानने आमदार सरनाईक यांच्याकडे केली होती. या मागणीचा सकारात्मक विचार करून आमदार सरनाईक यांनी याबाबत ठाण्याचे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे या घाटाला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांचे नाव द्यावे, या मागणीचे निवेदन दिले आहे. त्यामुळे देशभरात विविध मंदिरे आणि घाटांचा जीर्णोद्धार करणाऱ्या अत्यंत महत्वाच्या व्यक्तीच्या स्मृतीची या निमित्ताने दखल घेतली जाणार आहे.

उपवन तलावाच्या येथे बनारस घाटाच्या धर्तीवर ठाणे शहरातील पहिले उपवन घाट बनविण्यात आले. या घाटाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या उपवन घाटाला अनेक हिंदू तीर्थक्षेत्रे तसेच बनारस घाट व शरयू नदीच्या तिरावर घाट बांधणाऱ्या “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर” यांचे नाव देण्यात यावे यासाठी धनगर प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष दीपक कुरकुंडे यांच्यासह समाजाचे नेते भगवान देवकाते, महिला मंडळ अध्यक्षा माधवी नाईक,प्रतिष्ठाचे कार्याध्यक्ष महेश गुंड,गणेश बारगीर,उत्तम यमगर,उद्धव गावडे,महिला मंडळ सचिव गायत्री गुंड,स्मिता गावडे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली. सरनाईक यांनी तात्काळ या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ठाणे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांना निवेदन देत या घाटाला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांचे नाव देण्याची मागणी केली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या पेशवेकालीन मराठ्यांचे वीर सेनानी मल्हारराव होळकर यांच्या सून असून त्यांचा जन्म इ.स. दि. ३१ मे १७२५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालूक्यातील चौंडीया खेड्यात झाला. अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर हे इ.स. १७५४ मध्ये कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पड़ले, त्यानंतर १२ वर्षानी मल्हारराव होळकर यांचे देखील निधन झाले. त्यांच्या पश्चात मराठा साम्राज्याच्या माळवा प्रातांचा कारभार अहिल्यादेवी बघू लागल्या. अहिल्यादेवी लढाईमध्ये स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. त्याचबरोबर त्या उचित न्यायदानासाठी देखील प्रसिध्द होत्या. त्यांनी भारतभर अनेक हिंदू मंदिरे व नदी घाट बांधले. त्यांनी काशी विश्वेश्वर,सोमनाथ सारख्या अनेक मंदिरांचा जिर्णाध्दार केला. त्यांनी अनेक तिर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले असून त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. लोकांना रोजगार मिळावा म्हणून त्यांनी त्या काळामध्ये औद्योगिक धोरण आखले होते.

Tags: अहिल्याबाई होळकरआमदार प्रताप सरनाईकठाणे
Previous Post

बल्लारपूर येथील शासकीय विश्रागृह येथे स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.

Next Post

रेल्वेत नोकरीच्या नावाने फसवणुक करणार्‍याला वर्धा पोलिसांनी ठोकल्या बेड्या, इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
रेल्वेत नोकरीच्या नावाने फसवणुक करणार्‍याला वर्धा पोलिसांनी ठोकल्या बेड्या, इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता.

रेल्वेत नोकरीच्या नावाने फसवणुक करणार्‍याला वर्धा पोलिसांनी ठोकल्या बेड्या, इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In