संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी मोबा.न.9923497800
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ आपल्या सामाजिक जबाबदारीच्या उपक्रमांद्वारे विविध उपक्रम राबवते, ज्यात गावातील लोकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जाते. हे लक्षात घेऊन धन्वंतरी प्रकल्पांतर्गत एका मागून एक असे मोफत आरोग्य शिबीर जीवती तालुक्यातील वेगवेगळ्या गावात राबवित असताना आपण बघत आहोत.
यावेळेस आज दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी जिवती तहसील येथील ग्रामपंचायत पल्लेझरी येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन सीएसआर अंतर्गत केले. यात एकूण 170 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला यामध्ये गावातील पुरुष, महिला, वृद्ध व शालेय विद्यार्थ्यांची तपासणी करून औषध वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यासाठी अल्ट्राटेक, माणिकगढ चे ई आर हेड नवीन कौशिक, धुरपताबाई बापुजी सीडाम सरपंच, लाला फजानीया शेख उपसरपंच, श्री. घोडमारे सचिव मरकागोंदी, डॉ. सुरज सोळंके वैद्यकीय अधिकारी टाटा कॅन्सर केअर चंद्रपूर, डॉ. टिंकल डेंगळे, डॉ. रूपाली यादव, प्रवीण कडूजी बुचे मुख्याध्यापक, कमलाबाई नागोराव मडावी ग्रामपंचायत सदस्य, ललिताबाई माणिक मेश्राम ग्रामपंचायत सदस्य, बापूजी शिडाम प्रतिष्ठित नागरिक अनिल गुलाबराव आंबटकर सहाय्यक शिक्षक, काजल मते सीएचओ, नंदपा यशोदा राठोड एचए पाटण, ए के यमलेल एएनएम नंदप्पा, नताशा देऊरकर स्टाफ नर्स, काजल विश्वास स्टाफ नर्स, वैष्णवी सहारे डीइओ, सौ सुरेखा रामचंद्र गायकवाड आशा वर्कर पल्लेझरी, सरपंच व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
या शिबिरात तोंडाच्या, गर्भाशयाच्या व स्तनाच्या कर्करोगाची तपासणी टाटा कॅन्सर केयर फौंडेशन च्या टीम कडून करण्यात आली. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण येथील पथकद्वारे बीपी आणि शुगर ची चाचणी करण्यात आली.
या आरोग्य शिबिराला यशस्वी करण्यासाठी अल्ट्राटेक सिमेंट, माणिकगड येथील डॉक्टरांच्या टीमने आणि सीएसआर टीम ने अथक परिश्रम घेऊन हे शिबीर यशस्वी केले. या शिबिरा दरम्यान नवीन कौशिक यांनी गावातील नागरिकाच्या आरोग्य बद्दल जाणून घेतले. या शिबिराचे आयोजन केल्याबद्दल सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी माणिकगड युनिटचे आभार मानले.