अनिल अडकिने सावनेर नागपुर प्रतिनिधी
मो. नं.- ९८२२७२४१३६
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर २३ जाने:- अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सावनेर शहरात दिवसभर भक्तिमय व उत्साहाचे वातावरण तयार झाले होते.
कलश यात्रा, मिरवणूक,भजन, पूजन, आरती, धार्मिक कार्यक्रम, नगारा व ढोल ताशांच्या गजरात रामनामाच्या जयघोषाने सावनेर नगरी दुमदुमली होती.
चिचपुरा ते गांधी पुतळा श्रीराम प्रभूच्या मूर्तीची मिरवणूक, शोभायात्रा काढण्यात आली होती. यावेळी अनेक ठिकाणी प्रसाद, महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते. शहरातील राम मंदिर, छिंदवाडा रोडवरील शिव मंदिर, होळी चौकातील त्र्यंबकेश्वर नागद्वार मंदिर, स्वामी महादेव मंदिर, पहिलेपारचे हेमंड शिव मंदिर, सिव्हिल लाईनचे राजेंद्र शेष मंदिर, बाजार चौकातील व गांधी चौकातील हनुमान मंदिर, प्रोफेसर कॉलनीतील गजानन मंदिर, सिताराम महाराज देवस्थान आदी मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमाचे तसेच प्रसाद वितरणाचे आयोजन करण्यात आले होते.

होळी चौक येथील प्रगती दुर्गा उत्सव मंडळ, उत्साही बाल गणेश मंडळ व सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम, भक्ती गीते तसेच सायंकाळी 7 ते 10 वाजता पर्यंत प्रिन्स म्युझिकल ग्रुप सावनेर तर्फे सुमधुर भक्तीगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांमध्ये सावनेर चे ठाणेदार श्री.मानकर, अशोक उमाटे, राजु शर्मा, अँड.भोजराज सोनकुसरे, तुषार उमाटे, डॉ.प्रशांत घोळसे, सुनील चाफेकर, रवींद्र देशमुख, महादेव घुमडे, संजय खोडकर, राजू भुजाडे, विलास उमाटे, तुषार घोलसे, शंकर बनकर, हरीश चाफेकर, सचिन करोले, रितेश बनकर, पद्माकर कामोने, सागर महतुरे, विकी उमाटे, गणेश चित्तेवाण, सुनील वाट, हर्ष घटे, कार्तिक बनकर,ओम कोचे, बंटी सातपुते, शुभम बनकर, मंगेश चरपे, सुहास चरपे, तुळशीराम बनकर, राजेंद्र घटे, प्रवीण करोले, दिवाकर नारेकर, बाल्या नाईक, मारुती नारेकर, मनोज भुते, पंकज चरपे, रामराव मोवाडे, मंदार मंगळे, किशोर कुंभारे, गिरीश बनाईत, पंकज चरपे, निखिल पोटभरे, रवींद्र ठाकूर, अभिषेकसिंग गहरवार, शेखर वाट, अनंता बांबल, जगदीश सातपुते, किरण धांडोळे व रिंकेश उमाटे होते.

