युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
नागपूर:- जील्हातील कळमेश्वर पासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या सावंगी घोगली गट ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच व आताचे उपसरपंच प्रज्वल तागडे यांनी सरपंच पदावर असताना स्वतःच्या शेतामध्ये कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला व पाच वर्षे होऊ नही ग्रामपंचायतचा कसलाही कर भरला नाही गावामध्ये वडिलांच्या नावाने घर असून दर पाच वर्षांनी होणारे नमुना आठ मध्ये वारंवार क्षेत्रफळ वाढवून क्रमांक 4803 चौरस फुटाचे 6508 चौरस फूट केले. नमुना आठव मध्ये खोडतोड करून वाढ केली वाढीव जागा गावठाणाची असून तेथे त्यांनी गुरांचा गोठा तयार करण्यात आला शौचालय बांधण्यात आले याशिवाय वाहतुकीचा रस्ता रोखणे सरकारी जागा ठराव करून पैसे घेऊन नावे चढविणे अशा अनेक तक्रारी असून गावकऱ्यांना अडचणीत आणून सोडले आहे.
याबाबत दिनांक 11 फेब्रुवारी 2022 ला गावकऱ्यांनी सहीनीशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस व मुख्य कार्यपालन अधिकारी पदाधिकारी जिल्हा परिषद नागपूर तसेच उपविभागीय अधिकारी सावनेर यांना तक्रार करण्यात आली. त्याचप्रमाणे तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती यावर सत्ता असल्याने गैरहर्जदारावर मुख्य पालन अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्याकडून बचावाची कारवाई होत आहे. कार्यपालन अधिकारी पंचायत अधिकारी इखार यांचे दिनांक 7 /9/2022 गटा ग्रामपंचायत सावंगी येथे मीटिंग घेण्यात आली असता येथील पंचायत अधिकाऱ्यांच्या उथळ भाषेमुळे अर्ध्यातच सभा संपवून येथील पंचायत अधिकारी निघून गेले. यामुळे कोणत्याही प्रश्नाचा निकाल लागलेला नाही यामुळे गावकऱ्यांनी पुढील कारवाई करिता नागपूर येथील आयुक्ताकडे तक्रार करण्यात आल्याचे गावकऱ्यांनी सांगितले यावेळी विनोद तागडे, विक्रांत तागडे, आकाश रंगारी, विनोद गजभिये, अमोल तागडे, श्रीकांत तागडे, नयन तागडे, युवराज तागडे, नरेश गजभिये व गावकऱ्यांनी केली आहे.