मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- विद्यार्थीमध्ये उपजतच काही गुण असतात ते शाळेत दाखल झाल्यानंतर त्यांचे अंगी असलेल्या कला गुणांना वाव देण्यासाठी शाळांतून विविध कार्यक्रम व उपक्रम राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन महोत्सव यातुन विद्यार्थीना एक व्यासपीठ निर्माण होऊन त्यांचे अंगी असलेल्या क्रिडा व सांस्कृतिक कला कौशल्यांना प्रेक्षकांसमोर सादर करण्याची संधी उपलब्ध होते. यातुन विद्यार्थीमध्ये धाडस निर्माण होईल. खेळातुन शिल, बुध्दी, सेवा, शिस्त, त्याग व बल याचे संवर्धन होईल. नृत्य व नाट्यषटातुन ते सामाजिक प्रबोधन करतील म्हणून शाळा लहान असो व मोठी असो त्यानी वर्षातून एकदा वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करावे असे आवाहन केंद्र प्रमुख लक्ष्मी कुसराम यांनी केले. त्या जिल्हा परिषद शाळा ओडीगुडम येथे आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.
यावेळी मंचावर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयंत टेकुलवार, माजी सरपंच मधुकर वेलादी, पोलिस पाटील लच्चमा पानेमवार, उपाध्यक्ष मल्लेश टेकुलवार, मुरलीधर कोडशेपवार, मुख्याध्यापक संतोष बद्दीवार, सुमित्रा वासेकर, हनमंत संदरापवार, शंकर टेकुलवार, ज्योती तलांडे यांची होती.
शाळेतील इयत्ता पहिली पासूनच्या सर्वच विद्यार्थीनी या कार्यक्रमात सहभाग दर्शवून आपले कला कौशल्य गावक-यांसमोर सादर केलेत.
यादरम्यान विद्यार्थींच्या सहशालेय क्रिडा स्पर्धा घेण्यात आल्यात.सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थींना मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संतोष बद्दीवार यांनी केले. विद्यार्थीना गुणवत्तापुर्ण शिक्षण देण्याबरोबर सहशालेय विविध कार्यक्रम व उपक्रम आयोजित करित असल्या बाबतची माहिती दिली. या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन शिक्षक डाॅ.आसाराम तोंडे यांनी केले. तर या कार्यक्रम यशस्वितेसाठी शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांचे सहकार्य मिळाले.