झिंगानूर ग्रामपंचायतचे सरपंचां निलिमा मडावी यांचे हस्ते ध्वजारोहन कार्यक्रम पार.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हातील झिंगानूर येथील प्रजासत्ताक (गणराज्य) दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आली आहे, झिंगानूर ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रथम नागरिक तथा सरपंचा सौ. निलीमा कारेजी मडावी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
शासकीय माध्यामिक आश्रम शाळा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय माध्यामिक आश्रम शाळेच्या मुख्याध्यापक धनराज कुमरी, यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी आश्रम शाळा विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या येथे पण 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण डॉ. मारगोनिवार हस्ते करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले सर्व कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.
झिंगानूर जिल्हा परिषद शाळेत 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. झिंगानूर जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष शामराव कुमरी यांच्या हस्ते करण्यात आले.
झिंगानूर उपपोलीस स्टेशन येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी झिंगानूर उपपोलीस स्टेशनचे पीएसआय (प्रभारी) अधिकारी श्री. घुले यांच्या हस्ते राष्ट्रीय झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी झिंगानूर उपपोलीस स्टेशन येथील कार्यरत असलेले सर्व कर्मचारी अधिकारी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रध्यजाला सलामी देण्यात आली.
झिंगानूर वनपरिक्षेत्र कार्यालयात 75 प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वनक्षेत्र साह्ययक (वनपाल) श्री. धखाते यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्यजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सर्व वन कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय ध्यजाला सलामी दिली. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठया प्रमाणात उपस्थित होते.